agriculture news in marathi, crop loan distribution become slow, akola,maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे लक्ष्य अद्यापही दूरच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 जुलै 2018

२०१५ पर्यंत ज्यांची कर्जमाफी झाली त्यांचे अर्ज बँकांनी घेतले. मात्र, अद्याप अनेकांना पीककर्ज मिळालेले नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले. काहींनी हात उसनवारी केली. कुणी नातेवाईक, मित्रांकडून पैसे घेतले. ज्यांची काहीच सोय झाली नाही, अशांच्या जमिनी पेरणीविना पडून अाहेत. पैशांअभावी ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली अाहे.     
- मनोज तायडे, शेतकरी, कौलखेड जहाँगीर, जि. अकोला.

अकोला : खरिपातील पेरणी अंतिम टप्प्यात पोचली असली तरी बँकांना पीक कर्जवाटपात २५ टक्क्यांपर्यंतसुद्धा अद्याप पोहोचता अालेले नसल्याची बाब समोर अाली अाहे. जिल्ह्यात पीक कर्जवाटपासाठी वेळोवेळी बैठका, बँकांविरुद्ध कारवाया करण्यात आल्या तरी पीक कर्जवाटपाची गती संथच अाहे. पीककर्जाअभावी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी उधारी, हातउसनवारीचे व्यवहार केले. तर काहींनी दागिने गहाण ठेवूनही पैसे काढल्याचे स्पष्ट झाले.

अकोला जिल्ह्यात खरिपासाठी १३३४ कोटींचे पीक कर्जवाटप उद्दीष्ट बँकांना देण्यात अालेले अाहे. यात जिल्हा बँकेला ६८३ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना ५२७ कोटी, खासगी बँकांना ४७ कोटी अाणि ग्रामीण बँकेला ७ कोटींचे उद्दीष्ट अाहे. यामध्ये सर्व बँकां मिळून अातापर्यंत २६९ कोटी ११ लाख रुपये पीक कर्जवाटप झाले. एकूण लक्ष्याच्या केवळ २१ टक्के हे वाटप झालेले अाहे.

अाजवर जिल्हा बँकेने १४१ कोटी ७० लाख, राष्ट्रीयीकृत बँकांनी ९६ कोटी, खासगी बँकांनी १५ कोटी तर ग्रामीण बँकांनी १५ कोटी ७८ लाख रुपये असे एकूण २६९ कोटींचे पीककर्ज वितरित केले आहे. जिल्ह्यात अद्याप १०६५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे लक्ष्य  गाठायचे अाहे.

दीड लाखांपर्यंत    कर्जमाफी झालेले सुमारे एक लाख ४० हजारांवर शेतकरी पीककर्ज मिळण्यास पात्र अाहेत. असे असताना अाजवर केवळ ३२ हजार १५६ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले. लाखांवर शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत अाहेत. या शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात पीककर्ज मिळणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, बँक पातळीवर होत असलेली दिरंगाई शेतकऱ्यांना मारक ठरली अाहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...
सांगलीत शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणारसांगली : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मिळणार ५...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण...
औरंगाबाद येथे शेतकरी आठवडे बाजार सुरुऔरंगाबाद  ः'कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद...
औरंगाबाद येथे शेतकरी आठवडे बाजार सुरुऔरंगाबाद  ः'कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद...
कोल्हापुरात आजपासून बाजारसमितीतच...कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव तपोवन मैदानावर...
ऊसतोड कामगारांना आवश्यक सेवा द्याव्यात...सांगली  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
सिंधुदुर्गात शेतातच सडताहेत कलिंगडेसिंधुदुर्ग  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर...