agriculture news in marathi, crop loan distribution become slow in varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात पीक कर्जवाटपाची गती संथ
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018

अकोला   ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत यंदा खरीप हंगामासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या सरासरी २५ टक्यांपर्यंत पीककर्ज वाटप झाले अाहे.

अकोला   ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत यंदा खरीप हंगामासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या सरासरी २५ टक्यांपर्यंत पीककर्ज वाटप झाले अाहे.

एप्रिल ते जुलै असा चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, कर्जवाटपाची स्थिती अत्यंत चिंताजनक अाहे. पीककर्ज वाटपाची गती वाढवण्याबाबत बँकांना सूचना करूनही त्यादृष्टीने काम होत नसल्याची बाब यामुळे स्पष्ट झाली अाहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये सरासरी २५ टक्के पीककर्ज वाटप झालेले असून, उर्वरित पीककर्जाचे वाटप कधी होईल असा प्रश्न कायम अाहे. अद्यापही पूर्ण न झालेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे या हंगामात पीक कर्ज वाटपास मोठी खीळ बसल्याचे सांगण्यात येते.     

अकोला जिल्ह्यात अातापर्यंत ३३६ कोटी ९९ लाख (२५.२५ टक्के), वाशीममध्ये  २४४ कोटी (२६ टक्के) अाणि बुलडाणा जिल्ह्यात ४०१ कोटी (२२.९९ टक्के) रुपयांचे पीककर्ज वाटप झाले अाहे.  अकोला जिल्ह्यात खरिपासाठी १३३४ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अाहे. यापैकी सर्वाधिक ६८३ कोटी रुपये जिल्हा बँकेला वाटप करायचे अाहेत. या बँकेने अातापर्यंत १५० कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे. उर्वरित रक्कम राष्‍ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण बँकांनी वितरीत केली.

वाशीम जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी  सुमारे १४७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिलेले असताना मागील चार महिन्यांत अातापर्यंत २२४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले अाहे. जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी २९ हजार ५५० शेतकऱ्यांना २४४ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १२२ कोटी रुपये हे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे. उर्वरित १०२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँकांनी केले अाहेत. अाता अाॅगस्ट अाणि सप्टेंबर हे दोन महिने खरिपाच्या पीक कर्ज वाटपासाठी बाकी अाहेत. सध्याची गती पाहता खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ५० टक्क्यांच्याही अात राहण्याची शक्यता अाहे.

पीक कर्ज वाटपाच्या मार्गात कर्जमाफीची प्रक्रीया पूर्ण न होणे हा सर्वांत मोठा अडथळा राहलेला अाहे. ज्यांना कर्जमाफी मिळाली अशांपैकी अनेक सभासद हे पात्र असूनही कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्याने ते पीककर्जासाठी वंचित राहत अाहेत. कर्जमाफीला वर्ष लोटले तरी असंख्य खाते अद्यापही नील झालेले नाहीत. प्रक्रिया सुरू असल्याने हे शेतकरी कर्ज मिळण्यापासून दूर अाहेत. शिवाय नियमित खातेदारांनी चालू कर्ज न भरल्याने त्यांनाही पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी अालेल्या अाहेत.
 

पीककर्ज वाटप स्थिती
जिल्हा उद्दिष्ट वाटप  टक्केवारी
अकोला १३३४  कोटी ३३६.९९  २५.२५
बुलडाणा  १७४५   ४०१.३३  २२.९९
वाशीम  १४७५  २२४  २६

 

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...