agriculture news in marathi, crop loan distribution become slow, varhad, maharashtra | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडात पीककर्ज वाटपाचा गाडा फसलेलाच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

अकोला  ः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ९) अमरावती विभागाची खरीप अाढावा बैठक अकोला येथे होत अाहे. या बैठकीत पीककर्ज वाटपाचा मुद्दा प्रामुख्याने गाजण्याची चिन्हे अाहेत. वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू असून बँकांकडून अडवणुकीचे प्रकार सर्रास होत अाहेत. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अाढावा बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याचे निर्देश दिले जात असताना त्याचा काहीही परिणाम झालेला दिसून अालेला नाही.

अकोला  ः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ९) अमरावती विभागाची खरीप अाढावा बैठक अकोला येथे होत अाहे. या बैठकीत पीककर्ज वाटपाचा मुद्दा प्रामुख्याने गाजण्याची चिन्हे अाहेत. वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू असून बँकांकडून अडवणुकीचे प्रकार सर्रास होत अाहेत. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अाढावा बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याचे निर्देश दिले जात असताना त्याचा काहीही परिणाम झालेला दिसून अालेला नाही.

वऱ्हाडात तीन जिल्हे मिळून खरिपासाठी ४५५४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना अातापर्यंत ३२८ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती समोर अाली अाहे. बुलडाणा जिल्ह्यात १७४५ कोटींचा पीककर्जवाटप लक्ष्यांक अाहे. या जिल्ह्यात अातापर्यंत अवघे ६५ कोटी म्हणजे ३.७३ टक्के पीककर्ज वाटप झाले अाहे. एक लाख ७४ हजार ५६१ खातेदार शेतकऱ्यांपैकी सहा हजार ७३८ शेतकऱ्यांना ६५ कोटी १० लाख रुपये वाटप झाले अाहेत. एक लाख ६८ हजार ८०० शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळालेले नाही. जिल्ह्यातील एकूण पीककर्ज वाटपाच्या १७४५ कोटींच्या लक्ष्यांकापैकी सर्वाधिक १२२४ कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना उद्दिष्ट देण्यात अालेले अाहे. परंतु या बँकांनी अाजवर अवघे ३८ कोटी ८६ लाख रुपयेच वाटप केले.

वाशीम जिल्ह्यात खरिपासाठी १४७५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात अाले. अातापर्यंत या जिल्ह्यात १०६ कोटींचे वाटप झाले. यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक १०, ७४२ सभासदांना ९४ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. उर्वरित बँकांनी मिळून १२ कोटी २५ लाख रुपये २१८० सभासदांना दिले. या जिल्ह्यात अातापर्यंत १७ टक्के पीककर्ज वाटप झाले.

अकोला जिल्ह्यात खरिपात १३३४ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात अाले. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेस ६८३ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना ५२७, खासगी बँकांना ४७ अाणि ग्रामीण बँकेला ७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप उद्दिष्ट अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत १५७ कोटींचे म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ १२ टक्के पीककर्ज वितरीत झाले. यात जिल्हा बँकेचा सर्वाधिक १२२ कोटी रुपयांचा वाटा अाहे. उर्वरित इतर बँकांनी मिळून केवळ ३५ कोटी रुपये वाटप केले.

जूनचा पहिला अाठवडा संपला. अाता पेरण्या लवकरच सुरु होण्याची शक्यता अाहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना बँकांकडून कर्ज वाटपाला गती अालेली नाही.
 

पीक कर्जवाटपाची स्थिती (कोटी रुपये)
जिल्हा लक्ष्यांक वाटप  टक्के
अकोला १३३४ १५७ १२
बुलडाणा १७४५ ६५.१० ३.७३
वाशीम १४७५ १०६   १७

 


इतर ताज्या घडामोडी
आमदार भुयार यांनी स्वतः केली गावात...अमरावती  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार...औरंगाबाद  : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या...
रावळगावच्या भावसा जाधव यांनी गरजूंना...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
अकोला ‘झेडपी‘चा ३६ कोटींचा अर्थसंकल्प अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बैठकांना आळा...
कापशीत शेतकरी गटातर्फे भाजीपाल्याचे...अकोला ः कृषी तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा (...
साताऱ्यात जिल्हा बँकेकडून पीककर्जास ३०...सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी...
पवना फुल उत्पादक संघाचे दररोज सव्वा...पुणे ः ‘कोरोना’मुळे सर्व देशात लाॅकडाऊन आहे....
ऊसतोड कामगारांसाठी शंभर कोटींचे पॅकेज...नगर  ः `कोरोना`च्या पार्श्वभूमीवर ...
पुणे जिल्हा परिषदेतर्फे कर्मचाऱ्यांना...पुणे : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वसमतमध्ये व्हाॅट्सअॅप ग्रुपवरून घरपोच...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील वसमत...
वालसावंगी परिसरात पावसाने पिके आडवीवालसावंगी, जि. जालना : ‘कोरोना’चे मोठे संकट...
लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी,...मुंबई  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही...मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’...
डॉक्टर, कर्मचारी युद्धातील आघाडीचे...मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णांची सेवा करणाऱ्या...
अमरावती ‘झेडपी’चे पदाधिकारी देणार दोन...अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास...कोल्हापूर  ः सर्व कारखानदारांनी त्यांचे काम...
नगर जिल्ह्यात रोज २६ लाख लिटर दूध संकलननगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात पावसाची...औरंगाबाद : एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव...
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करा ः विजय... नागपूर  ः कोरोना विषाणू नियंत्रणासाठी...
‘कृषी निविष्ठा विक्री केंद्र सम-विषम...परभणी ः कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर...