agriculture news in Marathi crop loan distribution over 50 percent Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात कर्जवाटप अखेर पन्नाशीपार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

खरीप हंगामासाठी कर्ज देण्याची मुदत संपत आली असताना मराठवाड्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १४ सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ५४.१४ टक्के पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी कर्ज देण्याची मुदत संपत आली असताना मराठवाड्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १४ सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ५४.१४ टक्के पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. व्यापारी बँकांची कर्ज पुरवठा करण्यात कमालीची अनास्था असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँकेने मात्र उद्दिष्टपूर्तीच्या उंबरठ्यापर्यंत कर्ज पुरवठा करण्याचे काम केले आहे.

मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २१०१ कोटी ६५ लाख ६८ हजार रुपये खरीप पीक कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत १४ सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ५ लाख ८७ हजार ११९ शेतकऱ्यांना २०२५ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयाचा कर्जपुरवठा करत ९६.३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.

ग्रामीण बँकेला १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याची उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत ९५.११ टक्के उद्दिष्टपूर्ती करत २ लाख २४ हजार ६०९ शेतकऱ्यांना १५५६ कोटी ६३ लाख ७ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला. 

व्यापारी बँका मात्र सर्वाधिक कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट मिळूनही प्रत्यक्ष कर्जपुरवठा करण्यात कमालीच्या माघारलेल्या असल्याचे चित्र आहे. व्यापारी बँकांना ८१६६ कोटी ५ लाख ६५ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टांचा पाठलाग करताना व्यापारी बँकांनी केवळ ३५.७ टक्के उद्दिष्टपूर्ती करत ३ लाख ९२६१ शेतकऱ्यांना २८६३ कोटी ६३ लाख ७० हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला.

कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्यासाठी या वारंवार बैठका सूचना आदींच्या माध्यमातून प्रचंड पाठपुरावा केल्यानंतरही व्यापारी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती जलद गतीने होताना दिसत नाही. साधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत खरिपासाठी कर्ज पुरवठा केला जातो. त्यानंतर रब्बीसाठी कर्जपुरवठाचे काम सुरू होते.त्यामुळे व्यापारी बँकांकडून खरिपासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाची पूर्ती होईल की नाही हा प्रश्न आहे.

लातूर जिल्हा
उद्दिष्ट: 
२२८३ कोटी ९४ लाख
पूर्ती:     १११६ कोटी ३१ लाख ६३ हजार
टक्केवारी:    ४८.८८

उस्मानाबाद जिल्हा
उद्दिष्ट: 
   १,५९० कोटी ५५ लाख ४७ हजार 
पूर्ती:     १८२ कोटी ७९ लाख २२ हजार 
टक्केवारी:    ४९.२२ 

नांदेड जिल्हा 
उद्दिष्ट:  
 २०३१ कोटी ६७ लाख ७० हजार 
पूर्ती:    ७७० कोटी ५८ लाख ११ हजार 
टक्केवारी:     ३७.९३

औरंगाबाद जिल्हा 
उद्दिष्ट:  
 ११९६ कोटी ८० लाख
पूर्ती:     ११३३ कोटी पाच लाख ७५ हजार 
टक्केवारी:    ९४.६७ 

जालना जिल्हा 
उद्दिष्ट: 
   १११५ कोटी ३१ लाख ९० हजार 
पूर्ती:      ७८३ कोटी ५९ लाख ७२ हजार 
टक्केवारी:    ७०.२६ 

परभणी जिल्हा 
उद्दिष्ट:  
   १५६७ कोटी २० लाख 
पूर्ती:    ६१२ कोटी ११ लाख ६१ हजार 
टक्केवारी:    ३९.६ 

हिंगोली जिल्हा 
उद्दिष्ट: 
   ११६८ कोटी ९५ लाख 
पूर्ती:    ४४८ कोटी ५९ लाख ४ हजार 
टक्केवारी:    ३८.३८


इतर अॅग्रो विशेष
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा...सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या...
‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत...
कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे :...पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना...
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’ पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे....
कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द...
गोंदियात पारा ६.८ अंशांवर पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली...
मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
खानदेशात कांदेबाग केळी जोमात जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक...