अकोल्यात १३९८ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  : आगामी खरीप हंगामासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांना १३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या पीककर्जाचे बँकांनी खरीप हंगामात पूर्ण वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यंत्रणांना दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात  झालेल्या आढावा बैठकीत खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाला मंजुरी देण्यासाठी आली. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरबीआय नागपुरचे लीड डिस्ट्रिक ऑफिसर अनुपम सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणिया, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे, नाबार्डचे व्यवस्थापक शरद वाळके, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे बॅंकनिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला सर्वाधिक ६७९ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. खासगी व्यावसायिक बॅंकांना ५९ कोटी, राष्ट्रीयीकृत बॅंकांना ५२० कोटी तर ग्रामीण बॅंकेला १३९ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्ह्यात गेल्या हंगामात कर्ज वितरण उद्दिष्टपूर्ती करण्यात बऱ्याच अडचणी आल्या होत्या. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या वेळी वारंवार बैठका घेत कारवाई केली. काही बॅंकांमधून शासकीय खात्यांमधील व्यवहार बंद केले होते. अशा स्थितीत यंदाही खरिपात पीककर्ज वाटपाची स्थिती कशी राहील, हे सध्या यंत्रणांकडून सांगितले जात नाही.

जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ७२४ शेतकऱ्यांना हे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्हा बॅंकेने १८६६० हजार शेतकऱ्यांना १५६ कोटी २६ लाख रुपये वितरित केले आहे.  उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्हाबॅंकेने २३ टक्के पीककर्ज वाटप केले. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४१०, खासगी बॅंकांनी ३८५ आणि ग्रामीण बॅंकेने १३२९ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. सर्व बॅंका मिळून १७७ कोटी २१ लाखांचे पीककर्ज वाटप आजवर झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com