Agriculture news in Marathi Crop loan distribution slow | Agrowon

पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जवाटप धोरणाची अवस्था राज्यातील बॅंकांमुळे ‘वराती मागू घोडे’ अशी झाली आहे. खरीप हंगामातील पिके आता कापणीला आलेली असताना पीक कर्जवाटप ७१ टक्क्यांवर आले असून, ते अजूनही सुरूच आहे. 

पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जवाटप धोरणाची अवस्था राज्यातील बॅंकांमुळे ‘वराती मागू घोडे’ अशी झाली आहे. खरीप हंगामातील पिके आता कापणीला आलेली असताना पीक कर्जवाटप ७१ टक्क्यांवर आले असून, ते अजूनही सुरूच आहे. 

राज्यात २०२१-२२ मधील आर्थिक वर्षात खरीप हंगामासाठी ५० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना ४० हजार ७९० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटणे अपेक्षित होते. खरिपासाठी मशागतीची कामे मे, जूनपासून सुरू होतात. जुलैत पूर्ण महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाची पेरणी संपुष्टात येते. त्यामुळे ऊस व फळपिके वगळता ऑगस्टअखेर राज्यातील बॅंकांनी इतर सर्व पिकांसाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र बॅंका ऐन हंगामात पीककर्ज वाटपात मागे हटतात. त्यामुळे राज्य शासनाला कधी तंबी देत; तर कधी रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार करण्याचा धाक देत बॅंकांना दामटावे लागते. 

सहकार विभागाने मात्र कर्जवाटपाची प्रक्रिया योग्य दिशेने चालू असल्याचे नमूद केले आहे. ‘‘सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बॅंकांनी ३५ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना २८ हजार ७६४ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. ही टक्केवारी ७१ टक्क्यांच्या आसपास आहे. आमच्या अंदाजानुसार येत्या महिनाअखेरपर्यंत कर्जवाटप ३५ हजार कोटींच्याही पुढे जाऊ शकेल. 

पुणे विभागात आतापर्यंत सात हजार ६८१ कोटी (उद्दिष्टाच्या ८५ टक्के) तर कोकण विभागात आठ हजार ३०६ कोटी रुपये (७७ टक्के) कर्जापोटी दिले गेले आहेत. नाशिक विभागात पाच हजार ९९१ कोटी (६५ टक्के), औरंगाबाद सहा ५४२ कोटी (५९ टक्के), अमरावती चार ९२५ कोटी (७४ टक्के) तर नागपूर विभागात दोन हजार ७९२ कोटी (७६ टक्के) रुपये वाटप झालेले आहे. बॅंका विविध अडचणींना तोंड देत कर्जवाटपाची प्रक्रिया पार पाडत आहेत. गंभीर स्वरूपाची दिरंगाई होत असल्याचे आम्हाला आढळून आलेले नाही,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

जिल्हा बॅंकांकडून १०० टक्के वाटप
खरीप कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी सुरुवातीपासून आघाडी घेत उद्दिष्टानुसार १०० टक्के कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकांनी २३ लाख शेतकऱ्यांना १३ हजार ६४९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बॅंकांचा कर्जवाटपाचा गाडा अर्ध्यावरच फसलेला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आतापर्यंत फक्त आठ लाख ८३ हजार शेतकऱ्यांना ११ हजार ३५५ कोटी रुपये कर्ज दिले आहे. हे वाटप उद्दिष्टाच्या केवळ ५७ टक्के इतके कमी आहे.
 


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...