agriculture news in marathi, crop loan distribution status, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्जवाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत १३९८ कोटी उद्दिष्टाच्या तुलनेत जेमतेम २० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरित करण्यात आले. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी असून राष्ट्रीयीकृत, खासगी तसेच ग्रामीण बँकांच्या शाखांची कामगिरी मात्र अद्यापपर्यंत तितकीशी समाधानकारक झालेली नसल्याचे दिसून येत आहे. या बँका पीक कर्जवाटपात पिछाडीवर पडलेल्या आहेत.

अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्जवाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत १३९८ कोटी उद्दिष्टाच्या तुलनेत जेमतेम २० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरित करण्यात आले. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी असून राष्ट्रीयीकृत, खासगी तसेच ग्रामीण बँकांच्या शाखांची कामगिरी मात्र अद्यापपर्यंत तितकीशी समाधानकारक झालेली नसल्याचे दिसून येत आहे. या बँका पीक कर्जवाटपात पिछाडीवर पडलेल्या आहेत.

जून महिना सुरू होण्यास आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आल्यास शेतकरी पेरणीच्या कामांना सुरवात करू शकताे. अशा स्थितीत शेतीच्या कामांसाठी, बियाणे, खतांच्या खरेदीसह मशागतीसाठी पैशांची मोठी गरज शेतकऱ्यांना आहे. यासाठी बँकांकडून दिले जाणारे पीककर्ज हाच एक मोठा पर्याय आहे.

या हंगामासाठी जिल्ह्यात १३९८ कोटींचा पीककर्ज वितरणाचा लक्षांक आहे. आजवर १८८ कोटी ७१ लाख रुपये म्हणजेच एकूण कर्जाच्या तुलनेत १९ टक्केच पीक कर्जवाटप झाले. २१ हजार ८३३ शेतकऱ्यांना हे पीककर्ज मिळाले आहे. यात प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ हजार ६९६ शेतकऱ्यांना १६४ कोटी ७१ लाखांचे पीक कर्जवाटप केले. राष्‍ट्रीयीकृत बँकांना ५२० कोटी ७९ लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना आजवर केवळ १० कोटी ४२ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. खासगी बँकांनीही ५९ कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ४७६ शेतकऱ्यांना ६ कोटी ८८ लाख रुपयांचे पीककर्ज दिले आहे. ग्रामीण बँकेला १३९ कोटींचा पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक असताना केवळ ६ कोटी ७१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. 

थकबाकीदारांचा प्रश्न
गेल्या हंगामात तसेच त्यापूर्वी पीककर्ज काढलेले व ते भरणा न करू शकलेले हजारो शेतकरी थकबाकीदार असल्याचे सांगितले जाते. या शेतकऱ्यांना येत्या हंगामासाठी पीककर्ज मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यासाठी खरिपात घेतलेला १३९८ कोटींचा लक्ष्यांक कसा पूर्ण होईल, हा पेच आहे. शिवाय गेल्या हंगामात तर पीक कर्जवाटपाची टक्केवरी केवळ ३१ टक्केच राहिली होती. अशा स्थितीत या वेळी १०० टक्के कर्ज वाटपापर्यंत पोचण्यासाठी आतापासूनच बँकांकडून सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...