agriculture news in marathi, crop loan distribution status in four disrticts, aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पीक कर्जवाटप केवळ सोळा टक्केच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट सुरू आहे. अशा वेळी पीक कर्जपुरवठा करण्यातही अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र आहे. चार जिल्ह्यांत पीककर्ज पुरवठा करणाऱ्या बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १६ टक्‍के कर्जपुरवठा केला आहे. अजूनही हजारो शेतकरी पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, त्यासाठी त्यांचे बॅँकांत हेलपाटे सुरू आहेत. 

औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट सुरू आहे. अशा वेळी पीक कर्जपुरवठा करण्यातही अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र आहे. चार जिल्ह्यांत पीककर्ज पुरवठा करणाऱ्या बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १६ टक्‍के कर्जपुरवठा केला आहे. अजूनही हजारो शेतकरी पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, त्यासाठी त्यांचे बॅँकांत हेलपाटे सुरू आहेत. 

कुठे पेरणीची संधीच मिळाली नाही, तर कुठे झालेली पेरणी पावसाअभावी अंगलट आली आहे. शेतकऱ्यांना खरीप व रब्बीत शेतीखर्चासाठी आधार मिळावा म्हणून शासनाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी व्यापारी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना त्यांच्या परिस्थितीनुसार कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले. एकूण ४९११ कोटी ३३ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी १५ जुलैपर्यंत चारही जिल्ह्यांत केवळ १६.१३ टक्‍के कर्जवाटप झाले. बॅंकांनी १ लाख ३३ हजार ५४७ सभासदांना केवळ ७९२ कोटी ४० लाख १७ हजारांचे कर्जवाटप केल्याचे समोर आले. 

या कर्जवाटपात २९.६७ टक्‍के कर्जवाटप करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आघाडीवर आहेत. कमी कर्जवाटप करणाऱ्या व्यापारी बॅंकांनी केवळ १२.५१ टक्‍केच कर्जपुरवठा करण्याचे काम केले. ग्रामीण बॅंकेने व्यापारी बॅंकांपेक्षा थोडे जास्त १८.१६ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली. कर्जपुरवठा झालेल्या सभासदांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ८४७५९, व्यापारी बॅंकेच्या ३५१४१, तर ग्रामीण बॅंकेच्या १३६४७ सभासदांचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात उद्दिष्टाच्या २८.८९ टक्‍के, जालना जिल्ह्यात १९.७५ टक्‍के, परभणीत ९.६० टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यात केवळ ७.६३ टक्‍केच खरीप पीककर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाने दिलेल्या ओढीसह त्याच्या असमान बरसण्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक हातभार मिळण्यासाठी ना बॅंका गंभीर दिसतात ना शासन. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडल्याचे चित्र आहे. 

चार जिल्ह्यांतील कर्जपुरवठा स्थिती

बॅंक उद्दिष्ट प्रत्यक्ष कर्जपुरवठा   टक्‍के
व्यापारी बॅंक  ३४३२ कोटी९३ लाख ७७ हजार ४२९ कोटी ३२ लाख ८ हजार  १२.५१
जिल्हा बॅँक ८२२ कोटी १२ लाख २३ हजार २४३ कोटी ९१ लाख २४ हजार २९.६७
ग्रामीण बॅंक ६५६ कोटी २७ लाख ११९ कोटी १६ लाख ८५ हजार १८.१६

 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...