agriculture news in marathi, crop loan distribution status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात खरिपात ४२ टक्के पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 जुलै 2018

खरिपात शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्जवाटपाची स्थिती सुधारणेसाठी प्रयत्न केले जात आहेत. सेंट्रल बॅंकेने कर्जवाटपाची गती वाढवली आहे. गावपातळीवर मेळावा, चर्चासत्र, बैठका घेऊन लोकांना माहिती दिली जात आहे. सध्या नगर आघाडीवर असून, यंदा दिलेले कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, नगर.
 

नगर : जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांना इशारा दिल्यानंतर खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याबाबत काहीशी सुधारणा झाली असली तरी बहुतांश बॅंकांची उदासीनता याबाबत कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरातील (खरीप-रब्बी) उद्दिष्टाच्या तुलनेत ३० टक्के कर्जवाटप झाले असून, खरिपातील उद्दिष्टाच्या तुलनेत ४२.८० टक्के कर्ज वाटप झाले आहे. सेंट्रल बॅंकेने सर्वाधिक ७० टक्के कर्ज वाटप केले आहे. राज्यातील एकूण कर्ज वाटपाच्या तुलनेत नगर जिल्हा आघाडीवर असल्याचा दावा अग्रणी बॅंकेने केला आहे.

जिल्ह्यामध्ये ५ लाख १३ हजार ६४ शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरिपात पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग असते. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्ज देण्याबाबत फारसे गांभीर्याने घेत नसल्याचा सातत्याने आरोप होत आहे. मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना चकरा मारायला लावणे असे प्रकार सुरू आहेत.

जिल्ह्यामध्ये खरिपात ३१९७ कोटी ४० लाख आणि रब्बीत १४२० कोटी १३ लाख असे ४ हजार ६१७ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील १ लाख ६४ हजार ३६५ शेतकऱ्यांना खरिपात दिलेल्या उद्दिष्टाच्या ४२.८० तर एकूण उद्दिष्टाच्या ३० टक्के कर्जवाटप झाले आहे. मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत कर्जवाटपाची स्थिती काहीशी सुधारली आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांपैकी बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बॅंकेची पीककर्ज वितरणाची स्थिती बरी आहे. आतापर्यंत सेंट्रल बॅंकेने २१४ कोटी १७ लाख, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ७२ कोटी८४ लाख,  महाराष्ट्र बॅंकेने १६४ कोटी ८३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. मात्र काही बॅंकांनी अजूनही कर्जवाटपाकडे गांभीर्याने पाहिले नाही. जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वाधिक २९६, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या ३१९, खासगी बॅंकेच्या ७५ आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ९ अशा ६९९ शाखा आहेत.  

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत १ लाख ३५ हजार ७१३ शेतकऱ्यांना ७७३ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने खरिपासाठी आतापर्यंत ५२ टक्के कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकेला खरिपात १४८९ कोटी २ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. बॅंकेच्या १४८९ सोसायट्या असून, सव्वासात लाखांच्या जवळपास सभासद आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...