agriculture news in marathi, crop loan distribution status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून पीक कर्ज उचलीचे प्रमाण कमी झाले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दीष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख रुपयांपैकी ११८१ कोटी ८ लाख रुपये म्हणजेच ६९ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. खरिपासाठी बँकेने ठेवलेल्या पीक कर्जवाटप उद्दीष्टाच्या तुलनेत प्रत्यक्ष कर्जवितरणात ५१७ कोटी ३४ लाख रुपयांनी घट झाल्याचे चित्र आहे.

पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून पीक कर्ज उचलीचे प्रमाण कमी झाले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दीष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख रुपयांपैकी ११८१ कोटी ८ लाख रुपये म्हणजेच ६९ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. खरिपासाठी बँकेने ठेवलेल्या पीक कर्जवाटप उद्दीष्टाच्या तुलनेत प्रत्यक्ष कर्जवितरणात ५१७ कोटी ३४ लाख रुपयांनी घट झाल्याचे चित्र आहे.

यंदा वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. परंतु प्रत्यक्षात पावसाने हुलकावणी दिली. पाऊस उशिराने सुरू झाला. त्यातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीककर्ज घेण्याकडे कल कमी झाला. त्यातच २०१६-१७ मध्ये शासनाने कर्जमाफी केली. त्याची प्रक्रिया सुरू असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली नाही. परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज न देण्याचे धोरण आहे. त्यामुळे चालू वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिल्याचेही चित्र आहे.

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी करतात. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग आदी पिकांसाठीही पीककर्जाचे वाटप केले जाते. परंतु या पिकांची पेरणी किंवा लागवड करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावांमधील २६६ शाखांमार्फत सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींमार्फत सभासदांना कर्जपुरवठा करते. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ११ टक्के दराने कर्जवाटप करीत आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...