agriculture news in marathi, crop loan distribution status, satara, maharashtra | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यात खरिपासाठी ७८ टक्के पीककर्ज वितरण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

सातारा  ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९२० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर १४८८ कोटी ६९ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ७८ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात जिल्हा बॅंकेने सर्वाधिक १०९६ कोटी ८६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा पायंडा कायम ठेवला असून, एकाही बँकेने ५० टक्क्यांवर कर्ज वितरण केलेले नाही.

सातारा  ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९२० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर १४८८ कोटी ६९ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ७८ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात जिल्हा बॅंकेने सर्वाधिक १०९६ कोटी ८६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा पायंडा कायम ठेवला असून, एकाही बँकेने ५० टक्क्यांवर कर्ज वितरण केलेले नाही.

खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १९२० कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबरअखेर खरीप पेरण्यांचा कालावधी असतो. या मुदतीत उद्दिष्टाच्या ७८ टक्के कर्ज वितरित झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बॅंकनिहाय हेच आकडे पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत. पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवितरण केले आहे. या हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेस एक हजार कोटींचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे जिल्हा बॅंकेने १०९६ कोटी ८६ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण केले आहे.

या बँकेने ११० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्ज वितरणाबाबत लक्ष दिले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँकांना ७११ कोटी १६० लाख रुपयांचे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टापैकी ३३३ कोटी ७५ लाख रुपये म्हणजेच ४७ टक्के कर्ज वाटप केले गेले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रला १५० कोटींचे कर्ज वितरण उद्दिष्ट होते. यापैकी या बँकेने ८५ कोटी ४४ लाखांचे म्हणजेच ५७ टक्के कर्जवाटप केले. स्टेट बॅंक ऑफ इंडियास १५० कोटींचे पीक कर्ज वितरण उद्दिष्ट होते. यापैकी या बँकेने ९४ कोटी ४१ लाखांचे म्हणजेच ६३ टक्के कर्जवाटप केले. बँक ऑफ इंडियास १४० कोटींचे पीक कर्ज वितरण उद्दिष्ट होते. यापैकी या बँकेने ५८ कोटी ७९ लाख ४२ टक्के कर्जवाटप केले आहे. 
 
राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कारवाईची मागणी
मागील दोन ते तीन वर्षांपासून राष्‍ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज वितरणाकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. यापैकी अनेक बँकांकडून किमान ५० टक्केही पीककर्ज वितरण केले जात नाही. या बँका स्वःताहून शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत आणि शेतकरी पोचले तर त्यांच्याशी योग्य संवाद होत नसल्यामुळे या बँकांचे कर्ज वितरण होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून या बॅंकाना कारवाईचा इशारा दिला जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यामुळे या बँकांनी कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...