नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
बातम्या
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून केवळ ११ टक्के पीककर्ज वितरण
उस्मानाबाद ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. या बॅंकांनी उद्दिष्टापैकी केवळ ११ टक्के कर्ज वितरण केले आहे. तुलनेत जिल्हा सहकारी बॅंकेने कर्ज वितरणात आघाडी घेतल्याचे दिसते. या बॅंकेने उद्दिष्टाच्या जवळपास ५० टक्के कर्जवाटप केले आहे.
उस्मानाबाद ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. या बॅंकांनी उद्दिष्टापैकी केवळ ११ टक्के कर्ज वितरण केले आहे. तुलनेत जिल्हा सहकारी बॅंकेने कर्ज वितरणात आघाडी घेतल्याचे दिसते. या बॅंकेने उद्दिष्टाच्या जवळपास ५० टक्के कर्जवाटप केले आहे.
गतवर्षीचा दुष्काळ, यंदा अद्याप समाधानकारक न झालेला पाऊस आदींमुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे चित्र दिसत असले तरी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामाततील विविध कामांसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने पीककर्ज योजना सुरू केली. या माध्यमातून विविध बॅंकांमार्फत कर्ज वितरण होते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी हे कर्ज भरणे अपेक्षित असते. कर्ज वितरणासाठी शासनाकडून बॅंकांना उद्दिष्ट ठरवून दिले जाते. बॅंकांना उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त पीककर्ज वितरण बंधनकारक करण्यात येते. असे असले तरी बॅंकांनी पीककर्ज वितरणाकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे आकडेवारीवरून समोर येते.
खरीपपूर्व मशागतीची कामाच्या वेळीही शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून काही प्रमाणात कामे केल्याचे दिसून येत आहे. आता ऑगस्ट महिनाही निम्मा संपून गेला असून मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असते. त्यासाठी शेतकऱ्यांना जूनपूर्वीच पैसे मिळणे अपेक्षित असते. बॅंकांनी एक एप्रिलपासूनच खरीप हंगामासाठी कर्ज वितरण करावे, असे आदेश शासनाने दिलेले असतात.
त्यामुळे जूनपूर्वी किमान ५० टक्के तरी कर्ज वितरण होणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यातील संबंधित बॅंकांनी आतापर्यंत सरासरी अवघे १७ टक्के कर्ज वितरण केले आहे. त्यात राष्ट्रीय बॅंकांनी सरासरी ११ टक्केच वितरण केले आहे. जिल्हा बॅंक मात्र तुलनेत आघाडीवर आहे. या बॅंकेने सुमारे उद्दिष्टाच्या पन्नास टक्के कर्ज वितरण केले आहे.