agriculture news in marathi, crop loan distribution status, usmanabad, maharashtra | Agrowon

उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून केवळ ११ टक्के पीककर्ज वितरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. या बॅंकांनी उद्दिष्टापैकी केवळ ११ टक्के कर्ज वितरण केले आहे. तुलनेत जिल्हा सहकारी बॅंकेने कर्ज वितरणात आघाडी घेतल्याचे दिसते. या बॅंकेने उद्दिष्टाच्या जवळपास ५० टक्के कर्जवाटप केले आहे.

उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. या बॅंकांनी उद्दिष्टापैकी केवळ ११ टक्के कर्ज वितरण केले आहे. तुलनेत जिल्हा सहकारी बॅंकेने कर्ज वितरणात आघाडी घेतल्याचे दिसते. या बॅंकेने उद्दिष्टाच्या जवळपास ५० टक्के कर्जवाटप केले आहे.

गतवर्षीचा दुष्काळ, यंदा अद्याप समाधानकारक न झालेला पाऊस आदींमुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे चित्र दिसत असले तरी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामाततील विविध कामांसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने पीककर्ज योजना सुरू केली. या माध्यमातून विविध बॅंकांमार्फत कर्ज वितरण होते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी हे कर्ज भरणे अपेक्षित असते. कर्ज वितरणासाठी शासनाकडून बॅंकांना उद्दिष्ट ठरवून दिले जाते. बॅंकांना उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त पीककर्ज वितरण बंधनकारक करण्यात येते. असे असले तरी बॅंकांनी पीककर्ज वितरणाकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे आकडेवारीवरून समोर येते. 

खरीपपूर्व मशागतीची कामाच्या वेळीही शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून काही प्रमाणात कामे केल्याचे दिसून येत आहे. आता ऑगस्ट महिनाही निम्मा संपून गेला असून मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी पैशांची आवश्‍यकता असते. त्यासाठी शेतकऱ्यांना जूनपूर्वीच पैसे मिळणे अपेक्षित असते. बॅंकांनी एक एप्रिलपासूनच खरीप हंगामासाठी कर्ज वितरण करावे, असे आदेश शासनाने दिलेले असतात.

त्यामुळे जूनपूर्वी किमान ५० टक्के तरी कर्ज वितरण होणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यातील संबंधित बॅंकांनी आतापर्यंत सरासरी अवघे १७ टक्के कर्ज वितरण केले आहे. त्यात राष्ट्रीय बॅंकांनी सरासरी ११ टक्केच वितरण केले आहे. जिल्हा बॅंक मात्र तुलनेत आघाडीवर आहे. या बॅंकेने सुमारे उद्दिष्टाच्या पन्नास टक्के कर्ज वितरण केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...“बळीवंत आम्ही, मातीतला दास धरलेली कास, मरणाची”...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...