यवतमाळ जिल्ह्यात ९७४ कोटींचे पीककर्ज वाटप

पीककर्जांसाठी शेतकऱ्यांची होणारी अडवणूक पाहता बॅंकांवर कारवाई केली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, बॅंकांनीही सहकार्य केल्याने पीककर्ज वाटपाचा आकडा ९४७ कोटींवर पोचला आहे. यानंतरही बॅंकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  : खरिपातील पीककर्ज वाटप हजार कोटींच्या जवळपास पोचले असून, येत्या काही दिवसांत एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. आतापर्यंत एक लाख ३८ हजार ४०५ शेतकऱ्यांना ९७४ कोटी ३९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

खरिपातील पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मागील दोन वर्षांपासून आखडता हात घेतला. त्यामुळे पीककर्ज वाटपाची टक्केवारी फारशी समाधानकारक नव्हती. यंदाही हंगामाच्या सुरवातीला बॅंकांनी मागील वर्षीप्रमाणेच धोरण राबविल्याने वाटप समाधानकारक नव्हते. शेतकऱ्यांची होणारी अडवणूक पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘एसबीआय’ला दणका देत शासकीय खाती बंद केली. त्यानंतर काही राष्ट्रीयीकृत बॅंकांची भूमिका शेतकऱ्यांना सहयोगाची नसल्याने पाच बॅंकांना ‘नोटीस’ बजावली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांना जाग आली. आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, ग्रामीण बॅंक यांनी एक लाख ३८ हजार ४०५ शेतकऱ्यांना ९७४ कोटी ३९ लाख ६१ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले. पीककर्ज वाटपाची टक्केवारी ४६.८८ टक्‍क्‍यांवर पोचली आहे. मागील तीन वर्षांतील आतापर्यंतची पीककर्ज वाटपाची रक्कम मोठी असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com