Agriculture news in Marathi Crop loan documents directly from the Wardha administration to the bank | Agrowon

वर्धा प्रशासनातर्फे पीककर्जाचे दस्तऐवज थेट बॅंकेला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

वर्धा ः पीकर्जासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून लागणारी कागदपत्रे तहसीलमार्फत थेट संबंधित बॅंक शाखेत पोचविण्याचा निर्णय प्रशासनाने घेत शेतकऱ्यांना सुखद धक्‍का दिला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

वर्धा ः पीकर्जासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून लागणारी कागदपत्रे तहसीलमार्फत थेट संबंधित बॅंक शाखेत पोचविण्याचा निर्णय प्रशासनाने घेत शेतकऱ्यांना सुखद धक्‍का दिला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लॉकडाऊनमुळे सातबारा, फेरफार पंजी दिली जात नव्हती. तर ऑनलाइन सातबारा देखील बॅंकेत ग्राह्य धरला जात नव्हता. पण आता कृषी कर्जाच्या कागदपत्रांसाठी होणारी शेतकऱ्यांची फरफट लक्षात घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांची कागदपत्र परस्पर बॅंकेला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बॅंक प्रशासनाला आदेश देत कर्जाला पात्र शेतकऱ्याची नावे जिल्हा प्रशासनाला ईमेल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याशिवाय बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बॅंकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात कर्मचारी पाठवून शेतकऱ्यांकडून कर्जासाठी अर्ज भरून घ्यावेत. जास्त गर्दी असणाऱ्या बॅंकेत असे करणे शक्‍य नसल्यास गावनिहाय्य शेतकऱ्यांना बोलवावे, असा निर्णयही घेण्यात आला. शेतकऱ्यांना जागेच्या मूल्यांकन प्रमाणपत्राची गरज पडते, यापुढे असे प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये, असे लीड बॅंक मॅनेजर यांनी बॅंकांना सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच कागदपत्रांसाठी यापुढे शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.

अशी आहे कार्यपद्धती
प्रत्येक राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखांकडे पीककर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बॅंक तहसील कार्यालयाच्या ईमेलवर पाठवेल. कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्‍यक सातबारा, आठ-अ, फेरफार पंजी, कच्चा नकाशा अशी कागदपत्रे संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून संबंधित बॅंकेत पोचविली जातील. शेतकऱ्यांना प्रतिज्ञा पत्रासाठी लागणारा मुद्रांक बॅंक उपलब्ध करून देईल.


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...