पीककर्ज व्याज, विमा हप्ता माफ होण्याची शक्यता

पीककर्ज व्याज, विमा हप्ता माफ होण्याची शक्यता
पीककर्ज व्याज, विमा हप्ता माफ होण्याची शक्यता

नवी दिल्लीः कॉंग्रेसशासित मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर योजना जाहीर केल्या आहेत. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील भाजप सरकारही नवीन वर्षात शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकाचा विमाहप्ता माफ करून गोड बातमी देण्याची शक्यता आहे. तसेच फळपिकांचा विमा हप्ताही कमी करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नियमित परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे चार टक्के व्याज माफ करण्याचीही शक्यता आहे. सरकारने हा निर्णय जाहीर केल्यास १५ हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे, तसेच अन्नधान्य पिकांचा विमाहप्ताही माफ करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर कॉंग्रेसने शेतकरी कल्याणाच्या अनेक योजना जाहीर केल्या. त्यात प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी केल्याने भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमधूनही कर्जमाफीची मागणी होऊ लागली आहे. देशातील अनेक भागात दुष्काळी स्थिती असल्याने शेतीसमोरील संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याची तयारी चालविली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे ४ टक्के व्याज भरणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे व्याज माफ केल्यास त्याचा सरकारी तिजोरीवर १५ हजार कोटींचा भार पडणार आहे. सध्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत ७ टक्के व्याजाने कर्ज मिळते. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वरील ३ टक्के व्याजसवलत दिली जाते. केंद्र सरकार दरवर्षी २ टक्के व्याज सवलत आणि ५ टक्के नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देते, यावर १५ हजार कोटी खर्च होतात. आता नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफी दिल्यास आणखी १५ हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे. म्हणजेच केंद्राला व्याज सवलतीवर ३० हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्याजमाफीची शक्यता दुष्काळ, शेतमालाचे पडलेले दर आणि इतर कारणांमुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मागील काही दिवसांमध्ये सरकारच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये विविध मुद्यांवर खल करण्यात आला. शेतीसमोरील समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार नियमित व्याज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे तीन टक्के व्याज सवलत देऊन उर्वरित ४ टक्के व्याज माफ करणार आहे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com