नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी ६ जून पर्यंत मुदतवाढ

नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज मागणी ऑनलाईन नोंदणीसाठी शनिवार (ता.६ जून) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
Crop loan online registration Extension till June 6 in Nanded
Crop loan online registration Extension till June 6 in Nanded

नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज मागणी ऑनलाईन नोंदणीसाठी शनिवार (ता.६ जून) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. दरम्यान, बुधवार (ता.२७) पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी नोंदणी केली. 

पीककर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSehk६tQ६VGKaSH_LSQ६o४u२S७dNATKcjwOK२mKLfD८qD७He०g/viewform?usp=sf_link या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणीसाठी रविवार (ता.१७) ते बुधवार (ता.२७) हा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत १ लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावर पीककर्ज मागणी नोंदणी केली.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांतर्फे संबंधित बँक शाखेस पाठविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीककर्ज मागणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार (ता.६ जून ) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी इटनकर आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रविण फडणीस यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com