नगर जिल्हा बॅंकेतर्फे वैयक्तिक हमीवर पीककर्ज

नगर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सातबारा, आठ अ उतारा नसला तरी वैयक्तिक हमीपत्रावर कर्ज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पीककर्ज मर्यादेतही वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंकेने दिली.
crop loan on personal guarantee from Nagar District Bank
crop loan on personal guarantee from Nagar District Bank

नगर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सातबारा, आठ अ उतारा नसला तरी वैयक्तिक हमीपत्रावर कर्ज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पीककर्ज मर्यादेतही वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंकेने दिली.

शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने पीककर्जाबाबत काही निर्णय घेतले आहेत. सध्या तलाठी व इतर कार्यालये बंद असल्याने व तलाठी उपलब्ध होत नसल्याने कर्ज मागणीसंबंधी द्यावा लागणारी सातबारा, ८ अ उताऱ्यांसह अन्य कागदपत्रे मिळण्यास अडचणी होत्या. त्यामुळे कर्जदार सभासदांना वैयक्तिक हमीपत्रावर कर्ज पुरवठा सुरू केलेला आहे. जे सभासद इतर बँका अथवा पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज परतफेड करू शकलेले नाहीत अशा सभासदांकडे पीककर्ज वगळून इतर कर्जाची बाकी असल्यास त्यांनाही जिल्हा बँकेमार्फत पीककर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचाही निर्णय झाला आहे. कर्जदार सभासदांकडून मध्यम, दीर्घ मुदत व इतर मुदत कर्जांची वसुली ३१ आॅगस्टपर्यंत करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू असतानाच कोरोनामुळे काही शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट असूनही त्यांचे आधार प्रामाणीकरण न झाल्याने ते या योजनेच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. अशा सभासदांनाही शासन आदेशानुसार यंदाच्या खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

कर्जपुरवठ्याविषयी ठळक माहिती

  • भुसार पिकांसाठी एकरी जास्तीत जास्त २० हजार रुपये देणार.
  • उसासाठी ५० हजार व डाळिंबासाठी एकरी ६० हजार रुपये.
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअन्वये कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांनाही नियमित कर्ज पुरवठा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com