मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच 

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाची सुरू असलेली गती मंदच असल्याचे चित्र आहे.
crop loan
crop loan

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाची सुरू असलेली गती मंदच असल्याचे चित्र आहे. सहकाराच्या औरंगाबाद विभागात केवळ १७ टक्के, तर लातूर विभागात १९ टक्केच पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती आजवर झाली आहे. 

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँक मिळून ४ हजार ४४१ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७९४ कोटी ४७ लाख ६८ हजार, व्यापारी बँकांना २९७८ कोटी ६७ लाख १ हजार तर ग्रामीण बँकेला ६६८ कोटी ३७ लाख ८४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. 

१४ जून अखेरपर्यंत या सर्व बँकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ही उद्दिष्टपूर्ती करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सर्वाधिक ५३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत १ लाख ३७ हजार ५५३ शेतकऱ्यांना ४२६ कोटी ४० लाख ३५ हजार रुपयांचे वाटप केले. व्यापारी बँकांनी मात्र केवळ ८ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना २४ हजार ५ शेतकऱ्यांना केवळ २५२ कोटी ९५ लाख ९९ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला. ग्रामीण बँकांनी १३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करताना १० हजार ६८५ शेतकऱ्यांना ९० कोटी १० लाख ६८ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला. 

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या ४ जिल्ह्यांत बँकांना सहा हजार ५१६ कोटी ८४ लाख ५५ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचा उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १३८६ कोटी ३१ लाख ८८ हजार, व्यापारी बँकांना ४१०४ कोटी ३४ लाख ७२ हजार, तर ग्रामीण बँकांना १०२६ कोटी १७ लाख ९५ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाची केवळ १९ टक्के पूर्ती या विभागात करण्यात आली आहे. सर्व बँकांनी मिळून २ लाख ४३ हजार ३५८ शेतकऱ्यांना १२५२ कोटी ३१ लाख १ हजार रुपये कर्जपुरवठा केला.  व्यापारी बॅंकांची उदासीनता  लातूर विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सर्वाधिक ६६ टक्के, उद्दिष्टपूर्ती करत २ लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांना ९२१ कोटी ५० लाख ५७ हजार रुपये कर्जपुरवठा केला. व्यापारी बँकांनी मात्र केवळ ५ टक्के उद्दिष्टपूर्ती करत २० हजार ५३१ शेतकरी सभासदांना २२५ कोटी ४४ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला. ग्रामीण बँकांनी १० टक्के उद्दिष्टपूर्ती करताना १२६६४ शेतकऱ्यांना १०५ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपयाचा कर्जपुरवठा केल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com