agriculture news in Marathi crop loan process slow in Marathwada Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाची सुरू असलेली गती मंदच असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाची सुरू असलेली गती मंदच असल्याचे चित्र आहे. सहकाराच्या औरंगाबाद विभागात केवळ १७ टक्के, तर लातूर विभागात १९ टक्केच पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती आजवर झाली आहे. 

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँक मिळून ४ हजार ४४१ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७९४ कोटी ४७ लाख ६८ हजार, व्यापारी बँकांना २९७८ कोटी ६७ लाख १ हजार तर ग्रामीण बँकेला ६६८ कोटी ३७ लाख ८४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. 

१४ जून अखेरपर्यंत या सर्व बँकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ही उद्दिष्टपूर्ती करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सर्वाधिक ५३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत १ लाख ३७ हजार ५५३ शेतकऱ्यांना ४२६ कोटी ४० लाख ३५ हजार रुपयांचे वाटप केले. व्यापारी बँकांनी मात्र केवळ ८ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना २४ हजार ५ शेतकऱ्यांना केवळ २५२ कोटी ९५ लाख ९९ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला. ग्रामीण बँकांनी १३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करताना १० हजार ६८५ शेतकऱ्यांना ९० कोटी १० लाख ६८ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला. 

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या ४ जिल्ह्यांत बँकांना सहा हजार ५१६ कोटी ८४ लाख ५५ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचा उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १३८६ कोटी ३१ लाख ८८ हजार, व्यापारी बँकांना ४१०४ कोटी ३४ लाख ७२ हजार, तर ग्रामीण बँकांना १०२६ कोटी १७ लाख ९५ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाची केवळ १९ टक्के पूर्ती या विभागात करण्यात आली आहे. सर्व बँकांनी मिळून २ लाख ४३ हजार ३५८ शेतकऱ्यांना १२५२ कोटी ३१ लाख १ हजार रुपये कर्जपुरवठा केला. 

व्यापारी बॅंकांची उदासीनता 
लातूर विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सर्वाधिक ६६ टक्के, उद्दिष्टपूर्ती करत २ लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांना ९२१ कोटी ५० लाख ५७ हजार रुपये कर्जपुरवठा केला. व्यापारी बँकांनी मात्र केवळ ५ टक्के उद्दिष्टपूर्ती करत २० हजार ५३१ शेतकरी सभासदांना २२५ कोटी ४४ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला. ग्रामीण बँकांनी १० टक्के उद्दिष्टपूर्ती करताना १२६६४ शेतकऱ्यांना १०५ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपयाचा कर्जपुरवठा केल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...