agriculture news in marathi Crop loss in Solapur district at 935 crores | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पिकांचे नुकसान ९३५ कोटींवर

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सोलापूर : ‘‘जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे’’, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शुक्रवारी (ता.३०) दिली.

सोलापूर : ‘‘जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे’’, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शुक्रवारी (ता.३०) दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. 

भरणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शेती, रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागाकडील नुकसान यांची एकत्रित माहिती घेतली. नुकसान सुमारे ९३५ कोटी २८ लाख रुपयांचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सर्वंकष अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.''

युरोपमधील काही देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातही संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भरणे यांनी केले. मास्क वापरला नाही, तर नागरिकांना ५०० रुपयांचा दंड करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, जेणेकरून नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत जाणीवजागृती होईल, अशा सूचना भरणे यांनी केल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. दुधभाते आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...