Agriculture News in Marathi Crop losses will be compensated at an increased rate | Page 2 ||| Agrowon

पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत पिकांचे नुकसान होते लाखाचे अन् मदत मिळते सात ते १४ हजार...अशी परिस्थिती असल्याने नुकसानभरपाईची मदत वाढवावी, अशी अनेक वर्षांची मागणी अखेर दिवाळीच्या तोंडावर शासनाने पूर्ण केली आहे.

येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत पिकांचे नुकसान होते लाखाचे अन् मदत मिळते सात ते १४ हजार...अशी परिस्थिती असल्याने नुकसानभरपाईची मदत वाढवावी, अशी अनेक वर्षांची मागणी अखेर दिवाळीच्या तोंडावर शासनाने पूर्ण केली आहे. आता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार, बागायत पिकांसाठी प्रतिहेक्टरी १५ हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, अशी वाढीव दराने मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील लाखो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 

जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. आतापर्यंत २०१५मध्ये झालेल्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार यापूर्वी मदत दिली जात होती. आता त्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना आधार मिळणार आहे.

या पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्‍टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. काही प्रमाणात ती प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. अर्थात, ही मदत जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या नुकसानीसाठी आहे की कायमस्वरूपी असणार, या बाबत स्पष्ट नमूद नसल्याने संभ्रमावस्था आहे. तसेच इतर बाबींच्या नुकसानीसाठी या पूर्वी २०१५मध्ये जे निकष व दर ठरवले आहेत तेच लागू राहतील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. 

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अद्याप सुरू असून, त्यानंतर लाभार्थी निश्‍चित करण्यात येऊन निधी मिळाल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाढीव दराने रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्यात तरंगली व सडली होती, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र प्रति हेक्‍टरी दहा ते पंधरा हजारांची मदत मिळणार असल्याने हा काहीसा आधार शेतकऱ्यांना मिळेल हे नक्की. 

प्रतिक्रिया 

शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी वाढीव दराच्या मदतीची घोषणा स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. मागील काही वर्षांत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाची ही मदत काहीप्रमाणात आधार देणारी ठरेल. 
- संभाजीराजे पवार, माजी सभापती, येवला 

 


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...