Agriculture news in Marathi crop lost payment immediately to farmer ः Dr. Pawar | Agrowon

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम द्या ः खासदार डॉ. पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

नाशिक : पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने महसूल यंत्रणेकडून पंचनामे झाले. मात्र, काही लाभार्थ्यांची नावे चुकल्याने नुकसान भरपाई प्रलंबित राहिली. यावर राज्य सरकारकडून त्यामध्ये दुरुस्ती होऊन मदत बँकेमध्ये येऊन पडली आहे. तरी अजूनही काही शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. ती मदत लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करा. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या युद्धपातळीवर सोडवा, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मदत करा, अशा सूचना दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

नाशिक : पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने महसूल यंत्रणेकडून पंचनामे झाले. मात्र, काही लाभार्थ्यांची नावे चुकल्याने नुकसान भरपाई प्रलंबित राहिली. यावर राज्य सरकारकडून त्यामध्ये दुरुस्ती होऊन मदत बँकेमध्ये येऊन पडली आहे. तरी अजूनही काही शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. ती मदत लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करा. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या युद्धपातळीवर सोडवा, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मदत करा, अशा सूचना दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन संदर्भात दिंडोरी तहसीलदार कार्यालयात सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची खासदार पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. 

उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पोलिस निरीक्षक अनिल बोरसे, आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे, दिंडोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मयूर पाटील आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. मात्र तो शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. असे प्रकार का घडतात, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याचप्रमाणे शेतीमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. 

यावेळी गरजूंना रेशनिंगची वाटप तसेच भाजीपाला बाजार मोकळ्या जागेत भरवावा, सोशल डिस्टन्स सूचना डॉ. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासह जनधन योजना, मनरेगा आदी योजनेची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जात आहे किंवा नाही याचा आढावा बैठकी दरम्यान घेण्यात आला. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...