agriculture news in marathi, crop in problem due to discontinuity in rain, Maharashtra | Agrowon

पावसाच्या खंडाचे खरीप पिकांवर सावट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये जुलै महिन्याच्या चांगला पाऊस झाला आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसात मोठा खंड पडला आहे. काही तालुक्यांमध्ये अवघ्या १ ते ५ दिवसांमध्ये अधिक पाऊस पडला आहे. तर काही तालुक्यांमध्ये सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने ‘खरीप’ धोक्यात आला आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकत असून, दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तर काही ठिकाणी पेरण्याही रखडल्याचे चित्र आहे. 

पुणे : कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये जुलै महिन्याच्या चांगला पाऊस झाला आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसात मोठा खंड पडला आहे. काही तालुक्यांमध्ये अवघ्या १ ते ५ दिवसांमध्ये अधिक पाऊस पडला आहे. तर काही तालुक्यांमध्ये सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने ‘खरीप’ धोक्यात आला आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकत असून, दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तर काही ठिकाणी पेरण्याही रखडल्याचे चित्र आहे. 

कृषी विभागाकडील नाेंदीनुसार दिवसभरात २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असेल तर तो पाऊस दिवस गणला जातो. अन्यथा तो कोरडा दिवस मानला जातो. नगर, पुणे, सोलापूर जिल्‍ह्यांत पावसाचा मोठा खंड असल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यात केवळ ३ ते ६ दिवस पाऊस पडला आहे. नगर पश्‍चिम भागात असलेल्या अकोले तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये १ ते ७ दिवस पाऊस पडला. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. जळगाव, नंदूरबार, धुळे जिल्ह्यातही काही तालुक्यांत अनेक दिवस कोरडे हवामान होते. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस कमी असल्याचे दिसून आले आहे. 

२४ जुलैपर्यंतच्या पावसाचा विचार करता नाशिकमधील देवळी २२ टक्के (७ दिवस), नगरमधील शेगाव २४ टक्के (२), राहाता १८ टक्के (२), सोलापुरातील उत्तर सोलापूर २४ टक्के (३), करमाळा २१ टक्के (३), सांगलीतील जत २२ टक्के (१२), आटपाडी १ टक्के (१) येथे पावसाने मोठी ओढ दिली आहे. तर बऱ्याच तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के नोंद झाली पावसाने दिवस कमी असल्याने खंड असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. कमी अधिक पावसावर पेरण्या उरकून घेतलेल्याने राज्यात पेरणीचे एकूण क्षेत्र वाढले आहे. मात्र, पावसाअभावी पिके कोमेजली असून, या भागात दुबार पेरण्यांचे संकट ओढावणार आहे. 

कमी दिवसांत अधिक पाऊस
राज्यातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, बीड जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये अवघे चार ते पाच दिवस पाऊस पडला आहे. मात्र पावसाचा जोर अधिक असल्याने या तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दिसत आहे. श्रीरामपूर तालुक्यात अवघ्या ४ दिवसांत १२९ टक्के पाऊस पडला असून, उर्वरीत २० दिवस या भागात पावसाची मुख्यतः उघडीप आहे. त्याचाही परिणाम पेरणी झालेल्या पिकांवर होणार आहे. यात नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात चार दिवसांत ५३ टक्के, पाथर्डीत चार दिवसात ५८ टक्के, पुणे जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर दौंड तालुक्यामध्ये चार दिवसांत सरासरीच्या अनुक्रमे ६२ टक्के, ५४ टक्के, ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तर सोलापुरातील बार्शी येथे पाच दिवसांत ५३ टक्के, साताऱ्यातील फलटण तालुक्यात पाच दिवसांत ५३ टक्के अाणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात चार दिवसांत ५५ टक्के, आष्टी तालुक्यात पाच दिवसांमध्ये ५० टक्के, तर तालुक्यात ४ दिवसांत सरासरीच्या ५६ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

२४ जुलैपर्यंत राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके (कंसात पावसाचे दिवस) 
नाशिक : मालेगाव ३० (५), नांदगाव २७ (४), येवला ३०(५), देवळी २२ (७).
धुळे : शिंदखेडा ४२ (७), 
जळगाव : चाळीसगाव ४३ (८), 
नंदूरबार : नंदूरबार ३० (८), शहादा ३२ (७),
नगर : परनेर ३७ (२), श्रीगोंदा २८ (१), कर्जत ३१ (२), शेगाव २४ (२), नेवासा ४७ (५), संगमनेर ४७.१ (६), कोपरगाव ४० (६), राहाता १८ (२),
पुणे : बारामती ४७ (२), 
सोलापूर : उत्तर सोलापूर २४ (३), दक्षिण सोलापूर ३४ (६), अक्कलकोट ३१ (६), मोहोळ २९ (२), माढा २९ (३), करमाळा २१ (३), पंढरपूर ४२ (४), सांगोला २७ (२), माळशिरस ३६ (२),  मंगळवेढा ३२ (४), 
सातारा : मान दहिवडी ४५ (२), 
सांगली : जत २२ (२), आटपाडी १ (१), 
औरंगाबाद : वैजापूर ३८ (३), कन्नड २७ (७), खुलताबाद २८ (७), सिल्लोड ४२ (७), सायगाव ४४ (९), फुलांब्री ३२ (७), 
बीड : गेवराई ३३ (४), अंबाजोगाई २७ (८), परळी २३ (३), धारूर ३७ (६), वडवणी  ३४ (६), शिरूर कासार (४),
लातूर : औसा ४८ (११), अहमदपूर ३२ (८), उदगीर ३२ (८), चाकूर २६ (९), रेणापूर ३८ (८), दावणी ४६ (८), जळकोट ३१ (८).
उस्मानाबाद : परांडा ४३ (४), भूम ३८ (७), 
नांदेड : बिलोली ३४ (९), मुखेड ४० (७), देगलूर २५ (७), 
परभणी : पालम २९ (६), सेलू ४६ (७), सोनपेठ ३१ (६), 


इतर अॅग्रो विशेष
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...