agriculture news in marathi, crop productivity reduced in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे खरिपासाठीचे स्वप्न भंगले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात घट येऊन यंदा शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये उत्पादकता थोडी जास्त अाहे; मात्र इतर पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादकता सरासरीच्या निम्म्यावर आली आहे. विभागात मुगाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल २ किलो आहे. त्या तुलनेत यंदा ३ क्‍विंटल ५२ किलो झाली आहे. उडदाची हेक्‍टरी उत्पादकता ४ क्‍विंटल २१ किलो असताना यंदा ४ क्‍विंटल आले आहे.

औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात घट येऊन यंदा शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये उत्पादकता थोडी जास्त अाहे; मात्र इतर पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादकता सरासरीच्या निम्म्यावर आली आहे. विभागात मुगाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल २ किलो आहे. त्या तुलनेत यंदा ३ क्‍विंटल ५२ किलो झाली आहे. उडदाची हेक्‍टरी उत्पादकता ४ क्‍विंटल २१ किलो असताना यंदा ४ क्‍विंटल आले आहे. सोयाबीनची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ८ क्‍विंटल ७६ किलो असताना यंदा हेक्‍टरी केवळ ५ क्‍विंटल १४ किलोच उत्पादन झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यात यंदा पावसाची अवकृपा कायम राहिली. अनेक टप्प्यात झालेली पेरणी व त्यानंतर मोठ्या प्रमाणातील पावसाच्या खंडांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांना तडा देण्याचे काम केले आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीनची पावसाच्या खंडांनी दैन केली असून त्यापाठोपाठ असलेल्या कपाशीतूनही पहिल्या दुसऱ्या वेचनीनंतर फार काही पदरात पडण्याची आशा शेतकऱ्यांना नाही. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील पीक कापणी प्रयोगानुसार मूग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट नोंदली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात निम्म्यापेक्षा कमी उत्पादकता  
औरंगाबाद जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ३ किलो इतकी आहे. यंदा मात्र केवळ १ क्‍विंटल ९६ किलोच मुगाचे हेक्‍टरी उत्पादन झाले आहे. उडदाची हेक्‍टरी ५ क्‍विंटल ७६ किलो उत्पादकता असताना केवळ २ क्‍विंटल ४० किलोच हेक्‍टरी उत्पादन झाले. सोयाबीन सरासरी उत्पादकता ७ क्‍विंटल ६४ किलो असताना केवळ ५ क्‍विंटल ६६ किलो सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. 

जालना जिल्ह्यातही फटका
जालना जिल्ह्यात सरासरी हेक्‍टरी ३ क्‍विंटल ३४ किलो पिकणारा मूग यंदा हेक्‍टरी केवळ २ क्‍विंटल ६५ किलोच पिकला आहे. हेक्‍टरी ४ क्‍विंटल २ किलो पिकणाऱ्या पिकणाऱ्या उडदाची उत्पादकताही हेक्‍टरी केवळ २ क्‍विंटल ८१ किलोच झाली. हेक्‍टरी ९ क्‍विंटल १० किलो सरासरी उत्पादकता असलेल्या जालना जिल्ह्यात सोयाबीन यंदा हेक्‍टरी ७ क्‍विंटल ७५ किलोच पिकले आहे. 

बीड जिल्ह्यात सोयाबीनला सर्वाधिक फटका 
बीड जिल्ह्यात मुगाची हेक्‍टरी उत्पादकता ३ क्‍विंटल ३२ किलो आहे. त्या तुलनेत मुगाचे केवळ २ क्‍विंटल ३८ किलो हेक्‍टरी उत्पादन झाले. उडदाचे  हेक्‍टरी उत्पादन ३ क्‍विंटल २५ किलो असताना यंदा ३ क्‍विंटल ३९ क्‍विंटल उडदाचे उत्पादन झाले. दुसरीकडे सरासरी ८ क्‍विंटल ३२ किलो उत्पादन असलेल्या सोयाबीनचे बीडमध्ये हेक्‍टरी केवळ २ क्‍विंटल २० किलोच उत्पादन झाले आहे. 

लातूर जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमीच उत्पादकता 
लातूर जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ४० किलो आहे. त्या तुलनेत मुगाचे हेक्‍टरी ४ क्‍विंटल ३९ किलो उत्पादन झाले आहे. उडदाची हेक्‍टरी ५ क्‍विंटल ९५ किलो उत्पादकता असताना हेक्‍टरी ४ क्‍विंटल ८५ किलो उत्पादन झाले आहे. सोयाबीनचे हेक्‍टरी ११ क्‍विंटल ७९ किलो उत्पादन अपेक्षित असताना ९ क्‍विंटल २५ किलो उत्पादन झाले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता घटली 
उस्मानाबाद जिल्ह्यात मुगाचे हेक्‍टरी सरासरी उत्पादन ३ क्‍विंटल २० किलो अपेक्षित असताना मूग हेक्‍टरी थोडा जास्त ३ क्‍विंटल २९ किलो पिकला आहे. उडदाचे सरासरी उत्पादन ३ क्‍विंटल ६७ किलो असताना हेक्‍टरी ३ क्‍विंटल ६६ किलो उडदाचे उत्पादन झाले आहे. सोयाबीनचे हेक्‍टरी ८ क्‍विंटल ४० किलो उत्पादन अपेक्षित असताना सोयाबीनचे उत्पादन हेक्‍टरी ५ क्‍विंटल ५ किलोच झाले असल्याचे आजपर्यतच्या पीक कापणी प्रयोगातून समोर आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता वाढली
नांदेड जिल्ह्यात मुगाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ४ क्‍विंटल २७ किलो आहे. त्या तुलनेत यंदा हेक्‍टरी ४ क्‍विंटल ४५ किलो मुगाचे उत्पादन झाले आहे. उडीदाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ४ क्‍विंटल १८ किलो असतांना यंदा मात्र उडीदाचे ५ क्‍विंटल ३१ किलो हेक्‍टरी उत्पादन झाले आहे. सोयाबीनची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ६ क्‍विंटल ७७ किलो असतांना यंदा मात्र हेक्‍टरी ७ क्‍विंटल ७३ किलो सोयाबीन पिकले आहे. 
 
परभणी जिल्ह्यात उडदाची उत्पादकता वाढली
परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ३ क्‍विंटल ८४ किलो आहे. त्या तुलनेत यंदा हेक्‍टरी ४ क्‍विंटल ३१ किलो मुगाचे उत्पादन झाले. उडीदाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी २ क्‍विंटल ८१ किलो असतांना यंदा हेक्‍टरी ५ क्‍विंटल २१ किलो उत्पादन झाले. सोयाबीनचे सरासरी हेक्‍टरी ८ क्‍विंटल ५३५ किलो उत्पादन असतांना यंदा हेक्‍टरी ९ क्‍विंटल ५५ किलो सोयाबीनचे उत्पादन झाले. 
 
हिंगोली जिल्ह्यात मुगाची उत्पादकता वाढली
हिंगोली जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ३ क्‍विंटल ७९ किलो आहे. यंदा हेक्‍टरी ४ क्‍विंटल ७० किलो मुगाचे उत्पादन झाले. उडीदाचे हेक्‍टरी ४ क्‍विंटल उत्पादन अपेक्षीत असतांना यंदा ४ क्‍विंटल ४० किलो उडीदाचे हेक्‍टरी उत्पादन झाले. सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ९ क्‍विंटल ७४ किलो असतांना यंदा मात्र ११ क्‍विंटल २० किलो सोयाबीनचे उत्पादन झाल्याचे पिक कापणी प्रयोगातून समोर आल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

 


इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...