‘वनामकृवि’ची विशेष पीकसंरक्षण सल्ला मोहीम सुरू

नरवाडी येथील शेतकरी अर्जुन जोगदंड यांच्या शेतावरील कपाशीची पाहणी करताना तज्ञ
नरवाडी येथील शेतकरी अर्जुन जोगदंड यांच्या शेतावरील कपाशीची पाहणी करताना तज्ञ

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांच्‍या बांधापर्यंत पोचण्याकरिता ‘विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ या विस्‍तार उपक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहीम गुरुवार (ता. १९) ते मंगळवार (ता. ७ ऑक्टोबर) या कालावधीत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५६ गावांमध्ये राबविण्‍यात आहे. या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्‍या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

गुरुवारपासून (ता. १९) सुरवात करण्यात आलेल्‍या या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे, गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जात आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांची दोन पथके तयार करण्यात आली असून यात कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ज्ञांचा समावेश आहे. या पथकात कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे यांच्‍या नेतृत्‍वाखाली डॉ. एस. जी. पुरी, डॉ. एम. एस. दडके, डॉ. पी. बी. केदार, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. ए. जी. बडगुजर, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. सी. व्ही. अंबाडकर, डॉ. एस. व्ही. पवार, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. आय. ए. बी. मिर्झा आदींचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. २४) सोनपेठ तालुक्यातील नारवाडी, खपाट पिंपरी आणि धामोणी येथे भेट देऊन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. नारवाडी आणि खपाट पिंपरी येथे शेतकरी मेळाव्यात कीटकशास्त्रज्ञ डॉ. केदार यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी पिकावरील किडींच्‍या नियंत्रणाकरिता विविध उपाययोजना, कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. पवार यांनी पिकांवरील रोग व्यवस्थापन तसेच रब्बी हंगामाच्या नियोजनात बीज प्रक्रियेबाबत माहिती दिली.

डॉ. पुरी यांनी प्रास्ताविक केले. नरवाडी येथील शेतकरी अर्जुन जोगदंड यांच्या ठिबक सिंचनावरील नांदेड-४४ बीटी कपाशी पिकाची शास्‍त्रज्ञांनी पाहणी केली. धामोणी येथे प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण नाथराव कराड यांच्या प्रक्षेत्र आणि पूरक उद्योगास भेट दिली. तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड, मंडळ कृषी अधिकारी श्री वाळके, कृषी विभाचे श्री मुंडे, श्री पवार आदींचे सहकार्य मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com