मोबाईल ॲपद्वारे हाेणार राज्यातील पीकपेऱ्याची नाेंद

मोबाईल ॲपद्वारे हाेणार राज्यातील पीकपेऱ्याची नाेंद
मोबाईल ॲपद्वारे हाेणार राज्यातील पीकपेऱ्याची नाेंद

पुणे : राज्यातील पीकपेऱ्याच्या अचूक नाेंदीसाठी ॲपचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभाग टाटा ट्रस्टकडून आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य घेणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. प्रायाेगिक तत्त्वावर ६ महसुली विभागांतील ६ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७६९ तालुक्यांतील ३ लाख १९ हजार ५४५ खातेदारांचा समावेश करण्यात येणार आहे.  हा प्रकल्प थेट शेतकऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात येणार असून, टाटा ट्रस्टद्वारे प्राेसीजर आॅफ सेल्फ रिपाेर्टिंग आॅफ क्राॅप्स बाय फार्मर ही फार्मर फ्रेंडली ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपची चाचणी पालघर जिल्ह्यातील करंजपाडा (ता. वाडा) येथे करण्यात आली. या चाचणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनुभवानंतर राज्यातील सहा महसुली विभागात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प महसूल, जमाबंदी, कृषी, अर्थ व सांख्यिकी आणि राष्ट्रीय सूचना केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भ्रमणध्वनीवरील आज्ञावली (ॲप) हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधित गावातील तलाठी, महसूल, कृषी अधिकाऱ्यांबराेबर शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना टाटा ट्रस्टद्वारे देण्यात येणार आहे. या याेजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवर महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिव आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. अशी आहे नाेंदीची पद्धत 

  •  पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी १५ दिवसांत पिकांची उगवण छायाचित्रासह अपलाेड करावी. 
  •  क्षेत्राची माहिती अक्षांश रेखांशासह हाेणार नाेंद 
  •  हंगाम संपेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उभ्या पिकाची छायाचित्रासह नाेंद करावी 
  •  नैर्सगिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या छायाचित्रांची नाेंद करावी (उदा.अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळ, दुष्काळ, टाेळधाड, कीडराेगांचा प्रादुर्भाव)
  •  अपलाेड केलेली माहिती सातबारा उतारा आणि भ्रमणध्वनीसह स्वयंमुद्रित करणे. शेतकऱ्याने अपलाेड केलेली माहिती पडताळणी करण्यासाठी तलाठी करणार प्रत्यक्ष पाहणी 
  •  स्मार्ट फाेन नसला तरी साध्या फाेन द्वारे एसएमएस द्वारे करता येणार नाेंद यासाठी तलाठ्यांकडे भ्रमणध्वनीची नाेंदणी आवश्‍यक 
  •  माेबाईल क्रमांकाची सात बारा उताऱ्यावर हाेणार नाेंद    
  • यासाठी हाेणार फायदे 

  •  कृषी पतपुरवठा सुलभ करणे 
  •  पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढणे 
  •  नैर्सगिक आपत्तीत अचुक भरपाई मिळणे या तालुक्यांमध्ये प्रकल्प
  • तालुका गावे खातेदार संख्या 
    बारामती (पुणे) ११७ ७७,७५५
    कामठी (नागपुर) ७७ ३९,१५० 
    वाडा (पालघर) १७२ ५५,९१०
    अचलपुर (अमरावती) १८५ ५४,६३८
    दिंडाेरी (नाशिक) १२८ ६४,३७२ 
    फुलंब्री (आैरंगाबाद) ९० २७,७२० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com