agriculture news in marathi, crop registration will be done by mobile app | Page 2 ||| Agrowon

मोबाईल ॲपद्वारे हाेणार राज्यातील पीकपेऱ्याची नाेंद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पुणे : राज्यातील पीकपेऱ्याच्या अचूक नाेंदीसाठी ॲपचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभाग टाटा ट्रस्टकडून आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य घेणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. प्रायाेगिक तत्त्वावर ६ महसुली विभागांतील ६ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७६९ तालुक्यांतील ३ लाख १९ हजार ५४५ खातेदारांचा समावेश करण्यात येणार आहे. 

पुणे : राज्यातील पीकपेऱ्याच्या अचूक नाेंदीसाठी ॲपचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभाग टाटा ट्रस्टकडून आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य घेणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. प्रायाेगिक तत्त्वावर ६ महसुली विभागांतील ६ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७६९ तालुक्यांतील ३ लाख १९ हजार ५४५ खातेदारांचा समावेश करण्यात येणार आहे. 

हा प्रकल्प थेट शेतकऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात येणार असून, टाटा ट्रस्टद्वारे प्राेसीजर आॅफ सेल्फ रिपाेर्टिंग आॅफ क्राॅप्स बाय फार्मर ही फार्मर फ्रेंडली ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपची चाचणी पालघर जिल्ह्यातील करंजपाडा (ता. वाडा) येथे करण्यात आली. या चाचणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनुभवानंतर राज्यातील सहा महसुली विभागात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प महसूल, जमाबंदी, कृषी, अर्थ व सांख्यिकी आणि राष्ट्रीय सूचना केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भ्रमणध्वनीवरील आज्ञावली (ॲप) हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधित गावातील तलाठी, महसूल, कृषी अधिकाऱ्यांबराेबर शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना टाटा ट्रस्टद्वारे देण्यात येणार आहे. या याेजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवर महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिव आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

अशी आहे नाेंदीची पद्धत 

  •  पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी १५ दिवसांत पिकांची उगवण छायाचित्रासह अपलाेड करावी. 
  •  क्षेत्राची माहिती अक्षांश रेखांशासह हाेणार नाेंद 
  •  हंगाम संपेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उभ्या पिकाची छायाचित्रासह नाेंद करावी 
  •  नैर्सगिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या छायाचित्रांची नाेंद करावी (उदा.अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळ, दुष्काळ, टाेळधाड, कीडराेगांचा प्रादुर्भाव)
  •  अपलाेड केलेली माहिती सातबारा उतारा आणि भ्रमणध्वनीसह स्वयंमुद्रित करणे. शेतकऱ्याने अपलाेड केलेली माहिती पडताळणी करण्यासाठी तलाठी करणार प्रत्यक्ष पाहणी 
  •  स्मार्ट फाेन नसला तरी साध्या फाेन द्वारे एसएमएस द्वारे करता येणार नाेंद यासाठी तलाठ्यांकडे भ्रमणध्वनीची नाेंदणी आवश्‍यक 
  •  माेबाईल क्रमांकाची सात बारा उताऱ्यावर हाेणार नाेंद    

यासाठी हाेणार फायदे 

  •  कृषी पतपुरवठा सुलभ करणे 
  •  पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढणे 
  •  नैर्सगिक आपत्तीत अचुक भरपाई मिळणे

    या तालुक्यांमध्ये प्रकल्प

तालुका गावे खातेदार संख्या 
बारामती (पुणे) ११७ ७७,७५५
कामठी (नागपुर) ७७ ३९,१५० 
वाडा (पालघर) १७२ ५५,९१०
अचलपुर (अमरावती) १८५ ५४,६३८
दिंडाेरी (नाशिक) १२८ ६४,३७२ 
फुलंब्री (आैरंगाबाद) ९० २७,७२० 

 

इतर अॅग्रो विशेष
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...