Agriculture news in marathi Crop returns approved from fruit crop insurance scheme in Jalgaon district | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून पिकांचे परतावे मंजूर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२०-२१ मधील नुकसानभरपाईची रक्कम किंवा परतावे अखेर मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांना हे परतावे दिवाळीपर्यंत मिळतील, असा दावा प्रशासन करीत आहे.  

जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२०-२१ मधील नुकसानभरपाईची रक्कम किंवा परतावे अखेर मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांना हे परतावे दिवाळीपर्यंत मिळतील, असा दावा प्रशासन करीत आहे.  

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत २०२०-२१ अंतर्गत अंबिया बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तापमान, अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे नुकसानीसंबंधी विमा संरक्षण या योजनेतून मिळाले होते. ३१ जुलै २०२१ रोजी विमा संरक्षण कालावधी संपला होता. यानंतर ४५ दिवसात म्हणजेच सप्टेंबरच्या मध्यात परतावे पात्र शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण, विमा कंपनीकडून पीकविम्याची मुदत संपली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत नव्हती. यावर खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विमा कंपनी प्रतिनिधी, बँक अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षकांच्या उपस्थितीत अनेकवेळा बैठका घेऊन निर्देश दिले. 

मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी सचिव व पालकमंत्र्यांना यांना पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकारमुळे नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी खासदार पाटील व रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केला. खडसे यांनी लोकसभेत याबाबत प्रश्नही उपस्थित केला होता. राज्याचे मुखमंत्री, कृषिमंत्री व कृषी सचिवांना पत्रव्यवहार केला. 

राज्य सरकारने तत्काळ राज्याचा हिस्सा देऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी कार्यवाही करावी, या बाबत खासदारांकडून पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती. 


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...