Agriculture news in Marathi Crop-shaped gold grown in the cemetery at Arvi | Agrowon

आर्वी येथील स्मशानात उगवले पीकरूपी सोने

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

आर्वी वर्धा रोडवर एसटी डेपोच्या मागे बोहरा समाजाचे सात एकरांत कब्रस्थान आहे. या कब्रस्थानात संजय वानखडे यांनी मागील दोन वर्षांपासून शेती कसत आहेत.

आर्वी, जि. वर्धा : येथील सेवानिवृत्त प्राध्यापक संजय वानखडे यांनी स्मशानभूमीत शेती करून आर्वीकरांचे लक्ष वेधले आहे. आर्वी वर्धा रोडवर एसटी डेपोच्या मागे बोहरा समाजाचे सात एकरांत कब्रस्थान आहे. या कब्रस्थानात संजय वानखडे यांनी मागील दोन वर्षांपासून शेती कसत आहेत. प्रा. वानखडे यांनी आतापर्यंत विविध फळझाडे, फुलझाडे लावली असून त्यांनी विविध प्रकारचे पीक घेतले. आता सध्या पपईची बाग त्यांनी लावली आहे. यातून चांगले उत्पन्न त्यांना मिळत आहे. या समाजातील पाहुणेमंडळी, नागरिकही विरंगुळा म्हणून या कब्रस्थानात फिरायला जातात, रममाण होतात. 

बोहरा समाजातील लहान मुलांसाठी या कब्रस्थानात प्रा. वानखडे यांनी बगीचाचे नियोजन केले आहे. रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी परिवारांनी इथे येऊन दिवस व्यतीत करायला हवा, मुलांचे मनोरंजन होईल आणि थोरामोठ्यांना थोडा विरंगुळा मिळेल, असे प्रा. वानखडे यांनी सांगितले. वानखडे यांनी तब्बल ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. यानंतर त्यांनी २०१० मध्ये विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवली. खचून न जाता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. वानखडे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जुळले असल्याने शेतीतून लोकांची भीती दूर करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांनी बोहरा कब्रस्तानाची शेतीसाठी निवड केली. आर्वीतील संजयनगर येथे कब्रस्तानाची सात एकर जागा आहे. येथेच त्यांनी सेंद्रिय शेती फुलवली आहे. येथे  विरंगुळ्यासाठी बगीचा तयार करून देण्याचे आश्वासन त्यांनी बोहरा समाजाला दिले आहे.

घेतात विविध पिके 
कब्रस्तानाच्या सात एकर जागेपैकी एका एकरात पपई, एका एकरात मिरची, दोन एकरांत तूर, तीन एकरांत कापूस, मक्का, भेंडी, टमाटर असे विविध पीक घेत आहे. लहान मुलांसाठी बगीचा तयार केला असून खेळणी लावली आहे. तसेच विविध प्रकारच्या फुलांचे झाड लावले आहेत.

शेतीतून नफा मला कमवायचा नाही. येथे येणाऱ्या दु:खी माणसांचे मन प्रसन्न व्हावे हीच माझी इच्छा आहे. मृतात्म्यालाही खऱ्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच अंधश्रद्धा दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. यातून दोन्ही उद्देश साध्य होत आहे. लोकांच्या मनातील भीती दूर होण्यासह निसर्गाकडे चला, सेंद्रिय शेती करा, दीर्घायुषी व्हा.
 - संजय अंबादास वानखडे, शेतकरी


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...