Agriculture news in Marathi, Crop Surveying with mobile battery light | Agrowon

मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

भिवापूर, नागपूर : अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक आढावा घेण्यासाठी सायंकाळी सहा वाजता नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पोहचले. मोबाईल बॅटरीच्या अंधुक प्रकाशात पथकातील सदस्यांनी शेतमालाच्या नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर पथकप्रमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले. यामुळे हा नुकसान पाहणी दौरा केवळ देखावा ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भिवापूर, नागपूर : अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक आढावा घेण्यासाठी सायंकाळी सहा वाजता नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पोहचले. मोबाईल बॅटरीच्या अंधुक प्रकाशात पथकातील सदस्यांनी शेतमालाच्या नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर पथकप्रमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले. यामुळे हा नुकसान पाहणी दौरा केवळ देखावा ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

नुकसानीची पाहणी पथक सोमवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता चंद्रपूरमार्गे नागपूर जिल्ह्यात दाखल झाले. पथकाच्या नियोजित दौऱ्यात केवळ भिवापूर तालुक्‍याचा समावेश होता. माजी आमदार सुधीर पारवे यांनी दत्तक घेतलेल्या भिवापूर तालुक्‍यातील नक्षीवडद, सोनेगाव व भिवापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन आढावा घेणार होते. त्यासाठी दुपारी तीन वाजताची वेळ देण्यात आली होती. यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी, शेतकरी व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दुपारी दोन वाजतापासून भिवापुरात पोहचले होते. पाच वाजतानंतर केंद्रीय पथक आले नसल्याने ते आता कुठे पाहणी करणार अशी चर्चा सुरू झाली होती. सायंकाळी सहा वाजता केंद्रीय पथक भिवापूर येथे पोहचले. 

एसडीओ हिरामन झिरवाड, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका कृषी अधिकारी जारोंडे, कृषी अधिकरी रवींद्र राठोड यांच्यासमवेत पथक नक्षीमार्गावरील माणिक लोहकरे व प्रफुल्ल गजभिये यांच्या शेतात गेले. येथे मोबाईलच्या बॅटरीमध्ये त्यांनी शेतमालाची पाहणी केली. अंधार अधिक गडद झाल्याने पाहणी शक्‍य नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागले. नियोजित कार्यक्रमानुसार पिकाची पाहणी करणे शक्‍य झाले नाही. 

मोबाईलच्या प्रकाशात अधिकाऱ्यांना नुकसानीचा अंदाज आला का? केवळ दोन शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादातून त्यांना परिपूर्ण नुकसानीचा अंदाज आला असावा काय? असे प्रश्‍न उपस्थितांनी केले. पोहचलेल्या अनेक शेतकऱ्यांशी पथकातील सदस्य संवाद साधून शकले नाहीत यामुळे हा पाहणी दौरा केवळ देखावा ठरेल काय?, अशी प्रतिक्रिया याकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

मांडल्या व्यथा
पथकातील अधिकाऱ्यांनी माणिक लोहकरे यांच्या शेताची पाहणी केली. लोहकरे यांनी सहा एकरात धानाची रोवनी केली होती. त्यांना सव्वाशे क्विंटलचे उत्पन्नाचा अंदाज होता. मात्र पावसामुळे केवळ २५ उत्पादन झाले आहे. हे धान कापनीला परवडत नाही ते जनावरांना खाऊ घालन्याशिवाय पर्याय नाही असे लोहकरे यांनी पथकाचे प्रमुख आर. पी. सिंग यांना सांगितले. याशिवाय प्रफुल्ल गजभिये यांच्या कपाशीची पाहणी कली.
 


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...