ढगाळ वातावरणामुळे धास्ती

crop damage
crop damage

पुणेः मागील दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडल्याने द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा मोसंबी आणि द्राक्ष पिके प्रभावित झाली आहेत. द्राक्षामध्ये मण्यांना तडे जाणे, डाऊनी आणि भुरीचा प्रादुर्भाव तर, डाळिंबावर तेलकट डागरोग येण्याची भीती आहे. केशर आंब्यासाठीही पोषक वातावरण नसून हापूसवर तुडतुडा आणि चिकटा येण्याची शक्यता आहे. तर, संत्रा बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेने आंबिया बहार अडतणीत आला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक, येवला, सिन्नर तालुक्यांमध्ये बुधवारी (ता.२५) तुरळक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांमध्ये तयार होत असलेल्या घडांचे नुकसान होण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी बोलून दाखवली आहे. कोकणातील हापूस आंब्यावर ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा, चिकटा पडण्याची भिती आहे. काही ठिकाणी मोहारावर तुडतुडा पडल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले आहे. सोलापुरात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण अधिकच वाढले. सकाळी दहा वाजेपर्यंत हे वातावरण तसेच होते. त्यानंतरही काहीसे ऊन, काही ढगाळ असे वातावरण राहिले. या वातावरणामुळे द्राक्षावर डाउनी, भुरी तर डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वाढली आहे. साहजिकच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  डिसेंबर संपून चालला, तरी केशर आंब्याला बहरण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत नाही. तसेच आंबे बहरासाठी मोसंबी उत्पादकांच्या भागात ताणावर होत्या. त्या बागांमध्ये पाऊस झाला त्यांच्या ताणाच्या कालावधीत खोडा घातला गेला आहे. त्यामुळे बहरासाठी तानावर असणाऱ्या मात्र पाऊस झालेला मोसंबी बागांमधील झाडांना फुलाऐवजी पालवी फुटण्याची शक्यता जास्त आहे.  ‘‘विदर्भातील मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोषक, तर आंबिया बहर घेणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा अवकाळी पाऊस ठरला आहे. त्यासोबतच बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल’’, अशी माहिती संत्रा बागायतदारांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com