agriculture news in Marathi, crop under treat in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

पडलेल्या पावसाच्या भरवशावर तीन बॅग सरकी लावली. ती उगवली. पण, पावसाअभावी कोमेजून चालली आहे. पावसाअभावी चार एकर पेरणी बाकी आहे. सध्या जनावरांसाठी चारा, पाणी हा चिंतेचा विषय आहे.
- धनंजय सोळंके, नागापूर, ता. परळी वै., जि. बीड.

औरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान सरासरीच्या तुलनेत केवळ ५३ .५ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात गतवर्षी १ जून ते १३ जुलै २०१८ दरम्यान सरासरीच्या तुलनेत १०२.४ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने गतवर्षी दुष्काळी स्थिती होती. यंदाही अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. ज्या भागात पडलेल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकल्या त्या भागात पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात आली आहेत.

मराठवाड्यात यंदा खरिपाच्या सर्वसाधारण ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत २४ लाख ३१ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या  ४८.६६ टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकलेली आहे. असमान पाऊस आणि सुरवातीला पाऊस झालेल्या भागात आता पावसाने ओढ दिल्याने पेरलेली पिकं करपण्याच्या स्थितीत आहेत. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरणीच झाली नसल्याची स्थिती आहे.

यंदा आतापर्यंत मराठवाड्यातील एकही जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७० टक्के पाऊस झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात या जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बहुतांश भागात पेरणी नाही. औरंगाबाद व जालना वगळता उर्वरित जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत ५६ टक्क्यांच्या आतच पाऊस झाला आहे.

गतवर्षी १ ते १३ जुलै २०१८ दरम्यान चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे तूर्त तरी पावसाबाबतीत मागील वर्ष बरं होतं असं म्हणण्याची वेळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...
बेकायदा विदेशी खत आयातीचे परवाने रद्दपुणे : विद्राव्य खतांची बेकायदा आयात व विक्री...
‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे...नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर...
यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...