जिगाव प्रकल्प क्षेत्रात होणार पीकबदल

खारपाणपट्टयात पिकाला थेट पाणी दिल्यास जमीन क्षारपड होते. त्यामुळे ठिबकव्दारे पिकाच्या मुळांना पाणी मिळावे, यासाठी पाईपव्दारे पाणी आणि ठिबकव्दारे सिंचन केले जाईल. त्यानुसार पीक बदलही प्रस्तावित आहे. त्यासंबंधीचा आराखडा कृषी विभागने तयार करून तो केंद्राकडे पाठविला आहे. - रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती
जिगाव प्रकल्प क्षेत्रात होणार पीकबदल
जिगाव प्रकल्प क्षेत्रात होणार पीकबदल

नागपूर : खारपाणपट्टयात समृद्धी आणण्यास पूरक ठरणारा जिगाव प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पाईपव्दारे सिंचन आणि पाणी देण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात ठिबकचा वापर केला जाणार आहे. पीकबदल आराखडा त्यानुसार तयार करण्यात आला आहे. तो लवकरच केंद्र सरकारला पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यात निर्माणाधीन असलेल्या जिगाव प्रकल्पावर पाईपव्दारे सिंचनाचा प्रयोग होईल. शिवारात पाईपव्दारे पाणी पोचल्यानंतर पिकाला पाणी देतेवेळी तुषार व ठिबकचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे अपेक्षित आहे. पारंपरिक पिकांना हवामान बदलाचा मोठा फटका बसत असल्याची बाबही केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे पाईपव्दारे सिंचन प्रस्तावित असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या परिसरात पीक बदलही प्रस्तावित आहे. ३ जानेवारी १९९६ रोजी प्रशासकीय मान्यता, तर सुधारित मान्यता २० ऑक्‍टोंबर २००५ रोजी, व्दितीय सुधारित मान्यता २४ जून २००९ रोजी मिळाली.   

विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे अमरावती विभागीय अभियंता रवींद्र लांडेकर, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्यात पीक बदलाबाबत बैठक झाली. कमी पाण्यात येणाऱ्या शेवगा, सीताफळ, ॲपल बोर अशा पिकांचा पर्याय शेतकऱ्यांना देण्यावर त्यात चर्चा झाली. तसा आराखडा तयार करण्यात आला. केंद्र सरकारने सोयाबीन क्षेत्र कमी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

असा आहे प्रकल्प...

सांडवा लांबी ८ हजार २४० मीटर
द्वारमुक्‍त जलोत्सरणी  १५ बाय १२ मीटरचे १६ वक्र दरवाजे
सिंचन क्षमता   ८४ हजार २४० हेक्‍टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com