Agriculture News in Marathi Crops on 19,000 hectares destroyed in Nagpur | Page 2 ||| Agrowon

नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात १९ हजार ४०० हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुढे आले.

नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात १९ हजार ४०० हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुढे आले. ही माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली असून, त्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे २० दिवसांपूर्वी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांमधील नजरअंदाज पैसेवारी ५० पेक्षा अधिक दर्शविली होती. 

पावसामुळे सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकांचे झाले. मागील वर्षीही सोयाबीनला मोठा फटका बसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, १५ हजार १०० हेक्टरवर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. तर ४ हजार १०० हेक्टरमध्ये कापूस पिकांना फटका बसला. तूर पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन, अडीच महिन्यांत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली. पुरातही नुकसान झाले. राज्य शासनाने बाधित क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल, कृषी व जिल्हा परिषदेला दिले होते. या तिन्ही विभागांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातील पीक हानीचे क्षेत्र निश्‍चित करण्यात आले.

अलीकडेच राज्य शासनाने पूरबाधित पिकांसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत घोषित केली. त्यात ओलितासाठी प्रतिहेक्टर १५ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत, तर कोरडवाहू शेतीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरपर्यंतचा समावेश आहे. निवडणुकीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्‍यात मदत वळती करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
 


इतर बातम्या
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
सोलापूर जिल्ह्यातील एकरावरील फळबागा...सोलापूर, केम : करमाळा तालुक्‍यातील केम,...
 पीकविम्याची रक्कम जमा होण्यास प्रारंभ बुलडाणा ः जिल्ह्यात गेल्या काळात अतिवृष्टीने...
सहा वर्षांत अडीच हजारांवर  शेतकरी...अमरावती ः शेतकरी आत्महत्येनंतर त्यांच्या...