agriculture news in marathi Crops on 80,000 hectares affected by heavy rains in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने ८० हजार हेक्टरवर पिके बाधित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

परभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता.१२) ते गुरुवार (ता.२२) या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे नुकसान झालेल्या  ४०५ गावांतील १ लाख २ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले.

परभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता.१२) ते गुरुवार (ता.२२) या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे नुकसान झालेल्या  ४०५ गावांतील १ लाख २ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले. जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ८० हजार ६५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. येत्या दोन- तीन दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचे अंतिम क्षेत्र स्पष्ट होईल. त्यानंतर शासनाकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची मागणी केली जाईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. नाले, ओढे, नद्यांच्या पुराच्या पाण्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, भाजीपाला, फळपीके पिके बुडाली होती. सततच्या पावसामुळे सखल भागातील जमिनीत पाणी साचून राहिल्याने पिके कुजून गेली.

शेताचे बांध फुटले. जमिनी खरडून गेल्या. पुरामध्ये जनावरे वाहून गेली. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाच्या पथकांमार्फत बाधित गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.

सोमवार (ता.२) पर्यंत जिल्ह्यातील  ४०५ गावांतील १ लाख ३ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. त्यानुसार ७८ हजार ७११ हेक्टरवरील जिरायती पिके, १ हजार ७३३ हेक्टरवरील बागायती पिके, २१३.९१ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. उर्वरित पंचनाम्याची प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर मदत आणि पुनर्वसन विभागाकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधीची मागणी केली जाईल.

पुरात वाहून गेलेल्यांच्या वारसांना मदत

पुरामध्ये वाहून गेल्यामुळे मृत्यू झालेल्या बनवस (ता. पालम) येथील एका व्यक्तीच्या वारसांना शासनातर्फे  ४ लाख रुपये मदत देण्यात आली. पुरामध्ये मेंढ्या वाहून गेलेल्या शिर्शी बुद्रुक (ता. परभणी)  येथील मेंढीपालकांना देण्यासाठी प्रति मेंढी ३ हजार रुपये यानुसार निधीची मागणी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...