कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाअभावी पिके अडचणीत
आॅगस्ट महिना सुरू झाला तरी अजूनही पाऊस झालेला नाही. विहिरींमधील पाणीपातळी अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, शेवगा या पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, येत्या काळात पाऊस न झाल्यास फळबागांचे मोठे नुकसान होईल.
- अतुल शिंगाडे, शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे.
पुणे ः पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने झाले, तरी जिल्ह्यातील पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके चांगलीच अडचणीत आली आहेत. येत्या काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. पूर्वेकडील इंदापूरजवळ असलेले उजनी धरणही भरले आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पाण्याची अडचण नाही. मात्र बारामती, पुरंदर, दौंड, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. जून, जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर भागात खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असली तरी दमदार पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे.
पूर्व भागातील अनेक शेतकरी खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन व मूग या पिकांची पेरणी करतात. या पिकांकरिता या काळात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे.
पेरणी झालेल्या बाजरी, सोयाबीन व मूग या पिकांत आंतरमशागतीची कामे सुरू असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकास पावसाची आवश्यकता आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोऱ्यात आहे. सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून, पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून लागला आहे.
जूनमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. प्रत्यक्षात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन, मुगाची पेरणी केली आहे. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु, पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत, असे कर्डे (ता. शिरुर) येथील शेतकरी भाऊसाहेब पळसकर यांनी सांगितले.
- 1 of 582
- ››