agriculture news in marathi, crops become in trouble due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाअभावी पिके अडचणीत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

आॅगस्ट महिना सुरू झाला तरी अजूनही पाऊस झालेला नाही. विहिरींमधील पाणीपातळी अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, शेवगा या पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, येत्या काळात पाऊस न झाल्यास फळबागांचे मोठे नुकसान होईल. 
- अतुल शिंगाडे, शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे.

पुणे  ः पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने झाले, तरी जिल्ह्यातील पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके चांगलीच अडचणीत आली आहेत. येत्या काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. पूर्वेकडील इंदापूरजवळ असलेले उजनी धरणही भरले आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पाण्याची अडचण नाही. मात्र बारामती, पुरंदर, दौंड, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. जून, जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर भागात खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असली तरी दमदार पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. 

पूर्व भागातील अनेक शेतकरी खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन व मूग या पिकांची पेरणी करतात. या पिकांकरिता या काळात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे. 

पेरणी झालेल्या बाजरी, सोयाबीन व मूग या पिकांत आंतरमशागतीची कामे सुरू असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकास पावसाची आवश्यकता आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोऱ्यात आहे. सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून, पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून लागला आहे. 

जूनमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. प्रत्यक्षात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन, मुगाची पेरणी केली आहे. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु, पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत, असे कर्डे (ता. शिरुर) येथील शेतकरी भाऊसाहेब पळसकर यांनी सांगितले.

 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...