agriculture news in marathi, crops become in trouble due to lack of rain, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती पावसाअभावी अडचणीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर पूर्व भागात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळग्रस्त तालुक्यांत अत्यल्प पेरणी झाली आहे. या तालुक्यांत अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असून, पाण्याअभावी शेती पुरती अडचणीत आली आहे.

सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर पूर्व भागात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळग्रस्त तालुक्यांत अत्यल्प पेरणी झाली आहे. या तालुक्यांत अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असून, पाण्याअभावी शेती पुरती अडचणीत आली आहे.

जून महिन्यात पावसाने हजेरी न लावल्याने त्याचे परिणाम सध्या दिसू लागले आहेत. जिल्ह्यात मागील सप्ताहापर्यंत अवघी ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पश्चिमेकडे जादा पाऊस, तर पूर्वकडे पावसाची दडी, यामुळे जिल्ह्यातील अजूनही ६८ टक्के क्षेत्रावर नापेर आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ऊस वगळून दोन लाख ९० हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, मागील सप्ताहापर्यंत ९४ हजार ९२ हेक्टरवर म्हणजेच ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पश्चिमेकडे दमदार पाऊस असल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत, तर पूर्व भागात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. गत वर्षीच्या तुलनेत सर्वंच धरणांमध्ये पाणीसाठी कमी आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यातील पावसाच्या स्थितीवर धरणातील पाणीसाठ्याचे भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाला आहे.

यामध्ये सातारा तालुक्यात ६१२, जावलीत ७१३, पाटण तालुक्यात ६११, कराडमध्ये २७१, कोरेगाव तालुक्यात २४३, खटावमध्ये १४३, माणमध्ये ७१, फलटण तालुक्यात ७४, खंडाळा तालुक्यात १७३, वाईमध्ये २५३, महाबळेश्वरमध्ये २२६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर, सातारा, जावली, पाटण या तालुक्यांत अजूनही चांगला पाऊस होत असल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. माण, फलटण, खटाव या तीन तालुक्यांत अजून सरासरी १५० मिलिमीटर देखील पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे या तालुक्यांमध्ये पेरणी झालेली नाही.   


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...