agriculture news in marathi, crops become in trouble due to short rain, nagpur, maharashtra | Agrowon

नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच अपेक्षित पाऊस न झाल्याने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे धान रोवणी कामांवरही परिणाम झाला असून, या स्थितीचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.

नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच अपेक्षित पाऊस न झाल्याने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे धान रोवणी कामांवरही परिणाम झाला असून, या स्थितीचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.

कृषी विभागाकडील माहितीनुसार, गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत १२२.३ टक्‍के म्हणजेच ४०८.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी ७३.६ टक्‍के म्हणजेच २४५.८ मिमी पाऊस विभागातील सहा जिल्ह्यांत बरसला. सर्वांत कमी १६६.९ मिमी पावसाची नोंद वर्धा जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यात पावसाची सरासरी २८५.५ मिमी असते. सरासरीपेक्षा कमी पाऊस या जिल्ह्यात झाला आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन तसेच संत्रा लागवड होते. नागपूर विभागात ७.६४ लाख हेक्‍टरवर म्हणजेच केवळ ३९.६३ टक्‍के क्षेत्रावरच खरिपाची पेरणी होऊ शकली. उर्वरित क्षेत्रावर अद्यापही पेरणी झाली नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाने आठवडाभरापासून दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

फळपिकांची अवस्था बिकट
नागपूर, अमरावती विभागात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने फळ पिकांच्या अवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. नागपूर विभागात सुमारे साडेतीन हजार हेक्‍टरवरील बागा पाण्याअभावी जळाल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अपुरे पाणी आणि वाढत्या तापमानामुळे १२ हजार हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले. या संपूर्ण क्षेत्रात आता नव्याने लागवड करावी लागणार आहे. सरकारने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी हेक्‍टरी १८ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु, त्यासंबंधीचे आदेश अद्यापही निघाले नसल्याने ही मदत केवळ घोषणाच ठरते की काय? अशी भीती फळबागधारकांच्या मनात आहे.  
 
...अशी आहे स्थिती
नागपूर ः जिल्ह्यात २,५०,०२० हेक्टर म्हणजेच ५१.१३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. सुरवातीला पडलेल्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर मात्र सोयाबीनची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सोयबीनचे क्षेत्र ४८,८२७ हेक्‍टर आहे. 
भंडारा ः जिल्ह्यात १०, ५८९ हेक्टरवर म्हणजेच ५.२० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, ५० टक्‍के क्षेत्रावर धानाच्या रोपवाटिका टाकण्याचे काम झाले आहे. परंतु, पाण्याअभावी धान रोवणी रखडली आहे. 
चंद्रपूर ः जिल्ह्यात १२०२ हेक्‍टर क्षेत्रावर धान रोवणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण १,७४, ९७६ हेक्‍टर म्हणजेच ३९.०४ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
गोंदिया ः जिल्ह्यात भात पिकाची ४४३९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६१८७ हेक्टर म्हणजेच ३.३३ टक्के क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. 
गडचिरोली ः जिल्ह्यात २०,४०२ हेक्‍टर म्हणजेच १२.१६ टक्‍के क्षेत्रावर पेरणी पूर्णत्वास गेली आहे. १३,६७२ हेक्‍टर क्षेत्रावर फेकीव भात, तर १७९ हेक्‍टर क्षेत्रावर भाताची रोवणी झाली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...