Agriculture news in marathi Crops benefit from wet rains in Khandesh | Agrowon

खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

जळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस झाला. त्याचा पिकांना लाभ होत आहे. अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांना रासायनिक खते देण्यासह केळी पिकात नांग्या भरून घेण्याचे काम सुरू आहे. 

जळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस झाला. त्याचा पिकांना लाभ होत आहे. अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांना रासायनिक खते देण्यासह केळी पिकात नांग्या भरून घेण्याचे काम सुरू आहे. 

मागील तीन दिवसांत खानदेशातीलचा पारा कमाल ३६ अंश सेल्सीअसवर खाली आला आहे. हा पारा मागील आठवड्यात ४० अंश सेल्सीअसवर होता. ऊन तापत होते. शेतात काम करताना अंगाची लाहीलाही व्हायची. अनेक शेतकऱ्यांनी पिकांचे सिंचन सुरू केले होते. अशात सोमवारी (ता.१०) वातावरण बदलले. अनेक भागात पाऊस झाला. मंगळवारीदेखील (ता.११) अनेक तालुक्यांमध्ये भिज पाऊस झाला. यामुळे प्रकल्पांमधील जलसाठा फारसा वाढलेला नसला तरी पावसाची टक्केवारी वाढली आहे.

पाऊस पडल्यानंतर तो वाहून जाण्याचे प्रमाण अतिशय कमी राहिले. यामुळे या भिज पावसाने जमिनीतील ओलावा वाढला आहे. तो अनेक दिवस टिकून राहील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
जळगाव जिल्ह्यात पाऊस ६० टक्क्यांवर झाला आहे. जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ७६५ मिलीमीटर पाऊस पडतो. यातील निम्मेपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस पाचोरा, पारोळा, भडगाव या भागात झाला आहे. या भागात ऑगस्टमधील सरासरीएवढा पाऊस झाला आहे. कमी पाऊस जळगाव, यावल या भागात आहे.

धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. सर्वच पिके जोमात आहेत. कुठेही पावसाचा ताण न पडल्याने स्थिती चांगली आहे. जिल्ह्यातील कनोली प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तर, अनेर प्रकल्पातील आवक कायम असल्याने त्याचे दरवाजे उघडे आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात नवापूर, अक्कलकुवा, धडगाव या पर्वतीय भागात पाऊस कमी आहे. सर्वाधिक पाऊस तळोदा तालुक्यात झाला आहे. परंतु, जिल्ह्यात पीकस्थिती चांगली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...