agriculture news in marathi, crops damage due to continues rain, nagar, maharashtra | Agrowon

सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अनेक संकटे पार करत सोयाबीन, बाजरीची पिके आली. आता काढणीला असताना सततच्या पावसाने व शेतात पाणी साचल्याने शेतपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. 
- अतुल तांबे, शेतकरी

नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या पिकांना फटका बसत आहेच; पण पावसाचे पाणी शेतात साचल्याने रब्बीत पेरणी केलेली ज्वारीसह अन्य पिकेही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. 

जिल्ह्यात शेतीवरील संकटे कमी व्हायला तयार नाही. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने खरीप आणि रब्बी पिके आली नाहीत. त्याचा मोठा परिणाम शेतीवर झाल्याचे दिसून आले. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर खरिपाची पेरणी झाली असली तरी त्यानंतर झालेल्या पावसाला खंड पडला. त्याचा परिणाम मूग, उडीद, बाजरी, कापसावर झाला. आता अशा अनेक संकटांतून वाचलेली पिके आता काढणीला आली आहेत. आता चार दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात पाणी साचत आहे. सध्या खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, भात पिके काढणीला आलेली आहेत. काही ठिकाणी काढणीची कामे झाली आहेत. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने व शेतात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान होत असून कोंब फुटू लागले आहेत. 

यंदा रब्बी पेरणीला सुरवात झाली आहे. साधारण पन्नास टक्के क्षेत्र पेरूनही झाले आहे. रब्बीत ज्वारीचे क्षेत्र अधिक असते. मात्र, पेरलेल्या शेतात पाणी साचत असल्याने उगवण झालेल्या ज्वारीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय चार दिवसांपासून अनेक भागांत सूर्यदर्शन नसल्याने भाजीपाला व अन्य पिकांवर रोगांचाही प्रादुर्भाव होऊ लागला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान होत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...