agriculture news in marathi, crops damage due to continues rain, nagar, maharashtra | Agrowon

सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अनेक संकटे पार करत सोयाबीन, बाजरीची पिके आली. आता काढणीला असताना सततच्या पावसाने व शेतात पाणी साचल्याने शेतपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. 
- अतुल तांबे, शेतकरी

नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या पिकांना फटका बसत आहेच; पण पावसाचे पाणी शेतात साचल्याने रब्बीत पेरणी केलेली ज्वारीसह अन्य पिकेही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. 

जिल्ह्यात शेतीवरील संकटे कमी व्हायला तयार नाही. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने खरीप आणि रब्बी पिके आली नाहीत. त्याचा मोठा परिणाम शेतीवर झाल्याचे दिसून आले. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर खरिपाची पेरणी झाली असली तरी त्यानंतर झालेल्या पावसाला खंड पडला. त्याचा परिणाम मूग, उडीद, बाजरी, कापसावर झाला. आता अशा अनेक संकटांतून वाचलेली पिके आता काढणीला आली आहेत. आता चार दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात पाणी साचत आहे. सध्या खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, भात पिके काढणीला आलेली आहेत. काही ठिकाणी काढणीची कामे झाली आहेत. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने व शेतात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान होत असून कोंब फुटू लागले आहेत. 

यंदा रब्बी पेरणीला सुरवात झाली आहे. साधारण पन्नास टक्के क्षेत्र पेरूनही झाले आहे. रब्बीत ज्वारीचे क्षेत्र अधिक असते. मात्र, पेरलेल्या शेतात पाणी साचत असल्याने उगवण झालेल्या ज्वारीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय चार दिवसांपासून अनेक भागांत सूर्यदर्शन नसल्याने भाजीपाला व अन्य पिकांवर रोगांचाही प्रादुर्भाव होऊ लागला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान होत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...