नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील ७ लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांच्या ६ लाख ४८ हजार ३१६ हेक्टरील पिकांचे म्हणजेच ८०.६८ टक्के क्षेत्रावरील जिरायती, बागायती, बहुवार्षिक फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. पीकहानी झालेल्या क्षेत्रामध्ये एकट्या सोयाबीनचे क्षेत्र ५७.८९ टक्के आहे. महसूल आणि कृषी विभागातर्फे पीकनुकसानीचे क्षेत्र अंतिम करण्यात आले आहे. बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४३० कोटी ९९ लाख ८० हजार ३०० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती महसूल आणि कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणी, कापूस वेचणी, ज्वारीची सुगी असताना सातत्याने पाऊस; तसेच अतिवृष्टी झाली. यामुळे झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी, ग्रामविकास यंत्रणांनी पूर्ण केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ८ लाख ३ हजार ५१० हेक्टरवरील जिरायती, बागायती, बहुवार्षिक फळपिकांपैकी ६ लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ७ लाख १८ हजार ९९ शेतकऱ्यांच्या ६ लाख ४८ हजार ७८ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले. दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसान झालेले एकूण जिरायती क्षेत्र ४ लाख ६१ हजार ५३१ हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ६ लाख ३२ हजार २४९ आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र १ लाख ८६ हजार ५४७ हेक्टर आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या ८५ हजार ८५९ आहे. एकूण ६१ शेतक-यांच्या ६१ हेक्टरवरील बागायती पिकांचे, २६५ शेतकऱ्यांच्या १७७ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागातर्फे पीकनुकसानीचा अंतिम अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.   

पीकनिहाय नुकसानक्षेत्र (हेक्टर)
पीक  क्षेत्र
सोयाबीन ३,७५,३७३
कापूस  २,०४,१६५
तूर  १२,५७४
मूग  १२२३
ज्वारी  ३५,८८४
मका 
अन्य पिके  ४०,००६
तालुकानिहाय जिरायती पिकांचे बाधित क्षेत्र (हेक्टर), शेतकरी संख्या
तालुका   बाधित क्षेत्र शेतकरी संख्या
नांदेड  ३०,६७९   ३३,३७४
अर्धापूर  २९,८७२ २९,८७२
मुदखेड १६,९२५  २३,१७४
हदगाव ६४,५०० ६९,६२०
माहूर   २१,४०६  २४,३०८
किनवट  ४३,२१५ ५२,२१३
हिमायतनगर ३४,४०५  ३१,९७२
भोकर  ४१,५०७  ३८,४६६
उमरी    २७,५०५   ३१,४३६
धर्माबाद   २४,१७६  २६,३६७
नायगाव  ४६,६३३ ५३,६८२
बिलोली ३२,८२६  ५०,७६२
देगलूर  ४४,९९०  ४९,३३२
मुखेड ६६,३५६  ७६,३१०
कंधार  ६४,३१५ ६४,८६०
लोहा   ६३,३५४  ६२,३५१
बागायती पिके 
तालुका  बाधित क्षेत्र  शेतकरी संख्या
मुखेड   २२   ३०
धर्माबाद  ३९  ४२
बहुवार्षिक पिके 
तालुका बाधित क्षेत्र शेतकरी संख्या
माहूर   ३  २  
उमरी १४५   २३०
धर्माबाद २०  २१
मुखेड    ९  १२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com