agriculture news in marathi, crops damage due to rain, pune, maharashtra | Agrowon

अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी (ता. २०) विजेच्या कडाकडाटासह अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली असून द्राक्षे, कांदे, डाळिंब आदी पिकांचे काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सातारा, बीड, नाशिक जिल्ह्यांतील काही गावांत जोरदार पावसामुळे बंधारे भरून वाहू लागले आहेत. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.  

पुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी (ता. २०) विजेच्या कडाकडाटासह अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली असून द्राक्षे, कांदे, डाळिंब आदी पिकांचे काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सातारा, बीड, नाशिक जिल्ह्यांतील काही गावांत जोरदार पावसामुळे बंधारे भरून वाहू लागले आहेत. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.  

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (मंगळवारी, ता. २०) या भागात ढग जमा होऊन मध्यरात्रीनंतर अचानक पावसाला सुरवात झाली. त्यामुळे रब्बी ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अन्य पिकांचे नुकसानही झाले आहे.  

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शिरोळ या तालुक्यांना सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा बसला आहे. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात असलेल्या माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, सांगलीतील मिरजमधील सुभाषनगर, तासगाव, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, नगर जिल्ह्यांतील जामखेड, संगमनेर, नेवासा तालुक्यांतील चांदा, कौठा, महालक्ष्मीहिवरे, माका, नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील शिवनाई, वरखेडा, मातेरीवाडी, परमोडी या परिसरात जोरदार पाऊस झाला.

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर, धुळे जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर, टाकळी राजेराय, जालना जिल्ह्यातील वरूड, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौताडा, उस्मानाबादमधील ईट, अणदूर, नळदूर्ग, भूम परिसरात पहाटेपासून पाऊस पडण्यास सुरवात झाली. या भागात सकाळीही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, नांदेड, लोहा परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रब्बी ज्वारी पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. या पावसामुळे भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांना चांगलाच फटका बसला आहे.

सकाळी आठपासून हिंगोलीतील कन्हेरगाव नाका येथे पावसास सुरवात झाली.  विदर्भातील अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. उर्वरित नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांतही ढगाळ हवामान होते. कोकणातही काही प्रमाणात ढगाळ हवामान होते. दुपारनंतर ऊन सावल्याचा खेळ सुरू होता.   

कोल्हापूर : जोतिबा परिसरात आज (मंगळवारी) दुपारी धुवाधार पाऊस​

सातारा : बिदाल (ता.माण) येथील सिमेंट बंधारा वादळी पावसाने भरून वाहू लागला आहे. 
Image may contain: plant, tree, sky, outdoor and nature

कोल्हापूर : शिरोळ तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा. मंगळवारी (ता.20) दुपारी एक नंतर जोरदार पावसास सुरवात. उर्वरित जिल्ह्यात ढगाळ व थंड हवामानImage may contain: outdoor

मंगळवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान (अंश - सेल्सिअस) ः मुंबई २५.५, सांताक्रुझ २३.८, अलिबाग २५.०, रत्नागिरी २३.६, डहाणू २१.६, पुणे २२.१, जळगाव १६.२, कोल्हापूर २२.०, महाबळेश्वर १७.६, मालेगाव २२.२, नाशिक १७.१, सांगली २०.६, सांतारा १९.९, सोलापूर २१.६, औरंगाबाद २०.३, परभणी २०.५, नांदेड २१.५, अकोला २१.१, अमरावती २०.६, बुलढाणा १९.२, ब्रम्हपुरी १७.८, चंद्रपूर २१.२, गोंदिया १७.५, नागपूर १७.१, वर्धा १९.४, यवतमाळ २०.०.

कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज
पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून त्यामुळे राज्यातील विविध भागात पावसाला पोषक हवामान आहे. बुधवारी (ता. २१) दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व विजांच्या कडाकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या उत्तर भागात एक ठळक कमी दाब क्षेत्र तयार झाले असून दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. गुरुवारपासून (ता. २२) राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असली तरी पुन्हा राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  
 
या जिल्ह्यात पावसाची हजेरी

  • दक्षिण - मध्य महाराष्ट्र ः कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक.
  • खानदेश ः जळगाव, धुळे.
  • मराठवाडा ः औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानबाद, नांदेड, हिंगोली.
  • विदर्भ ः अकोला, बुलडाणा, वाशीम.

बीड : जिल्ह्यातील सौताडा (ता. पाटोदा) येथे जोरदार पाऊस...

इतर अॅग्रो विशेष
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...
कृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशादेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी...
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात...
जैवविविधतेचा ऱ्हास करणारा प्रकल्प नकोचनियोजित नवमहाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचं क्षेत्र...
पाण्याचा ताळेबंद गरजेचाच नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या...