agriculture news in marathi, crops damage due to rain, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मंचर, जि. पुणे  : अतिवृष्टीमुळे आंबेगाव तालुक्यातील ३२ हजार ७७४ शेतकऱ्यांचे एकूण १५ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रातील जिरायती व बागायती पिकांचे १७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तालुका कृषी कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला. अडचणीत सापडलेले शेतकरी सध्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

मंचर, जि. पुणे  : अतिवृष्टीमुळे आंबेगाव तालुक्यातील ३२ हजार ७७४ शेतकऱ्यांचे एकूण १५ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रातील जिरायती व बागायती पिकांचे १७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तालुका कृषी कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला. अडचणीत सापडलेले शेतकरी सध्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

तालुक्यातील ५६ आदिवासी गावांत भात व वरई ही मुख्य पिके आहेत; पण पावसाने या पिकांची दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी शेतीबांध वाहून गेल्याने आदिवासी कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांना लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष मोरमारे यांनी केली. सातगाव पठार भागात रब्बी हंगामात बटाटा पीक सडून गेले; तर लागवड केलेले कांदा पीक, कांदा रोपवाटिका पाण्यामुळे वाहून गेल्या. वाटाणा, भुईमूग, मका, लसूण, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाले, असे भावडी येथील शेतकरी अशोक रामदास बाजारे यांनी सांगितले.

पूर्व भागामध्ये चारापिकांचे व तरकारी मालाचे नुकसान झाले आहे. १४२ गावांत कृषी सहायक, कामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यात जिरायती पिकामध्ये भात, वरई, नाचणी, सोयाबीन, ज्वारी; तर बागायतीमध्ये ज्वारी, भुईमूग, टोमॅटो, तरकारी, मका, कांदा, बटाटा आणि द्राक्ष, डाळिंब, केळी आदी पिकांचा समावेश आहे. नुकसानभरपाईचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे, अशी माहिती कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी  दिली.  

नुकसानभरपाई कधी मिळणार?
जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सातगाव पठार व आदिवासी भागात पाच हजार ४२६ शेतकऱ्यांचे दोन हजार १९३ हेक्टर क्षेत्रातील चार कोटी ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यासंदर्भात नुकसानीचा अहवाल तालुका कृषी कार्यालयाने जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठविला; पण अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानभरपाईचे पैसे कधी मिळणार, याबाबत शेतकरी वर्गात प्रश्नचिन्ह आहे, असे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा रमेश कानडे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
गडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना...पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वादग्रस्त...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...