रत्नागिरी जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  ः ‘क्यार’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ५९९४ हेक्टर क्षेत्रावरील भात व नागली पिकांचे नुकसान झाले. सोमवारपर्यंत (ता. ५) ५०७० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये शेतीचे ३ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ३३ हजार ६४२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. काढणीपश्चात आणि उभ्या पिकाचे असे वेगवेगळे पंचनामे केल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. 

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे व क्यार चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील भात, नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्याचे काम ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत सुरू आहे. पंचनाम्यांबाबत शेतकऱ्यांच्या साह्यासाठी तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात भात व नागली लागवडीचे एकूण ७९,१४४ हेक्टर क्षेत्र आहे. पावसामुळे बाधित नजरअंदाज क्षेत्र ५९९४ हेक्टर आहे.

आत्तापर्यंत नेमण्यात आलेल्या यंत्रणेमार्फत ८३५ गावांतील २८,५३३ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात ३३, ६४२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ८४०४ शेतकऱ्यांचे १३३८ हेक्टरवर काढणीपश्चात, तर ३७३३ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात झाले आहे.  

तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेती (हेक्टर), किंमत (लाखात)
मंडणगड   १३८.५ २८.२५
दापोली ३२५.००  १७.६७
खेड   ९२०   ५०.५५
गुहागर   ४६२.३९ ३०.८७
चिपळूण ६४०.५७ ४३.५५
संगमेश्‍वर ७०३.९३  ४१.०६
रत्नागिरी  १२५० ६०.२१
लांजा ७०४ ४४.६७
राजापूर ८५० ५५.९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com