सोलापुरात सततच्या पावसामुळे कांदा, तूर पिकांचे नुकसान

कांदा पिकात साठलेले पावसाचे पाणी
कांदा पिकात साठलेले पावसाचे पाणी

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने थांबून-थांबून पाऊस होत असल्याने अनेक भागांत पिकांचे नुकसान होत आहे. करमाळा, माढा, दक्षिण सोलापूर भागांतील तूर, सोयाबीन, कांदा या पिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे पिकांत पाणी साचून राहिले आहे. काही ठिकाणी द्राक्ष, डाळिंब या फळबागांवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाने चांगली सुरवात केली आहे. शुक्रवारीही (ता. २५) दिवसभर अनेक भागांत पावसाच्या थांबून-थांबून सरी कोसळतच होत्या. अनेक भागांत पाऊस नव्हता, त्या भागासाठी हा दिलासा असला, तरी खरिपातील तूर, सोयाबीन या पिकांना मात्र आता त्याचा चांगलाच फटका बसला आहे. काही भागांत जेमतेम झालेल्या पावसामुळे कांदा लागवडीही बऱ्यापैकी झाल्या आहेत. विशेषतः करमाळा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांत कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. पण, या पावसामुळे कांदा पिकात पाणी साचले आहे. तुरीचीही अशीच अवस्था आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यतील विंचूर, मंद्रूप, निंबर्गी, भंडारकवठे भागात हे प्रमाण अधिक आहे. विंचूर येथील अप्पासाहेब गंचिनगोटे यांच्या तीन एकर क्षेत्रावरील कांदा, तसेच तीन एकरातील तुरीमध्ये पाणी साचल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केत्तूर (ता. करमाळा) परिसरात पाच दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. यामुळे लागवडीयोग्य कांदा रोपे, कांदा पिके पाण्याखाली गेल्याने कांदा सडू लागला आहे. कांद्याच्या सरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कांदा रोपे व काढणीस आलेल्या कांद्यावर परिणाम होत आहे. लागवडीयोग्य कांदयाचे सततच्या पावसामुळे नुकसान होत आहे, तर काढणीयोग्य कांदा शेतातच नासत आहे. लागवडीयोग्य कांदा रोपे जळून चालल्यामुळे आगामी काळात कांदा रोपांचा तुटवडा निर्माण होऊन कांदा लागवडीसाठी जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com