नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाने संयुक्‍तरीत्या तयार करीत शासनाकडे सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईपोटी सुमारे ४४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला. ५०१ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ६८६० शेतकऱ्यांचे ३२६७ हेक्‍टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५  हजार ८८० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, असे अहवालात नमूद आहे. यामध्ये ३३ टक्‍क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

कंपनीकडून अद्यापही भरपाईच नाही बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासकीय मदतीचे वितरण काही शेतकऱ्यांना करण्यात आले. परंतु कंपन्यांकडून मिळणाऱ्या मदतीची मात्र शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षाच आहे. त्यासोबतच नुकसानीपोटी मिळणाऱ्या विमा रकमेच्या लाभापासूनदेखील शेतकरी वंचित आहेत.परिणामी ही मदत मिळणार किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांमधून साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com