सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पिकांचे नुकसान

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा या नगदी पिकांसह रब्बीच्या ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे.
सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पिकांचे नुकसान Crops damaged by rains for second day in a row
सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पिकांचे नुकसान Crops damaged by rains for second day in a row

पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा या नगदी पिकांसह रब्बीच्या ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे. काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना पावसाच्या फटक्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मोहोरात आणि फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या आंब्याला मोठा फटका बसला आहे. उत्तर पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. तुलनेत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांता पाऊस कमी झाला आहे. उत्तर पुणे जिल्‍ह्यात जुन्नर खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्याला गुरुवारी (ता. ७) सायंकाळी वादळी पाऊस झाला. या पावसाने नारायणगाव, ओतूर, आळेफाटा परिसरातील पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकामध्ये पाणी साठल्यामुळे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर उगवलेल्या कांद्यावर मावा, भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची धोका निर्माण झाला आहे. गव्हावर मावा, तुडतुडा, तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून, पावसाचे पाणी शेतात साठल्यामुळे गहू व इतर सर्वच पिकांचे ही थोडे कमी अधिक प्रमाणात नुकसान होणार आहे. सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात गुरुवारी (ता. ७) रात्री सुमारे दोन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रात्रभर तुरळक पाऊस पडल्यानंतर पुन्हा शुक्रवारी पहाटे पेठ परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. या जोरदार झालेल्या पावसाने बहुतांशी शेतात उभे असलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. उत्पादनात घट येणार असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने पीक भुईसपाट झाले आहे. जनावरांच्या खायला वापरला जाणारा कडबा पावसाने भिजणार आहे.

शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांच्या पाणलोटनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये    

  • धरण    झालेला पाऊस
  • येडगाव    ४२
  • वडज    ५
  • डिंभे    ६
  • वडिवळे    ६
  • टेमघर    ५
  • खडकवासला    १
  • भाटघर    २
  • वीर     २
  • उजनी    २
  • चिल्हेवाडी    २
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com